Ads

लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा देणाऱ्या पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत




लॉक डाऊनमध्ये जीवनावश्यक सेवा देणाऱ्या
पारंपारिक व्यावसायिकांना पालकमंत्र्यांची मदत

ब्रह्मपुरी व सिंदेवाहीमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या 500 किट वाटप

चंद्रपूर दि ९ मे : नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या ऑटोचालक, रिक्शाचालक, केशकर्तनालयाचे व लॉन्ड्री व्यवसायात काम करणाऱ्या बारा बलुतेदारातील नाभिक व धोबी समाजातील व्यावसायिकांना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे आज वाटप केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शनिवारी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.
लॉक डाऊनच्या दीर्घ काळामध्ये नियमित व पारंपारिक व्यवसायाला देखील खोळंबा झाला आहे. यामुळे रोजच्या व्यवसायावर पोट चालणाऱ्या नागरिकांचे देखील नियमित व्यवसाय बंद पडले आहे. तर काहीजण अशा गंभीर परिस्थितीतही आजारी,गरजवंत लोकांसाठी घराबाहेर पडून सेवा देत आहेत. यामध्ये ऑटो चालक व रिक्षाचालकांचा प्रामुख्याने समावेश होतो. यासर्व व्यावसायिकांच्या व्यथा ऐकून जिल्ह्याचे पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी व सिंदेवाही येथील ऑटोचालक, रिक्षा चालक, केशकर्तनालय चालविणारे नाभिक समाजाचे,लॉन्ड्री चालवणारे व्यवसाय करणारे धोबी समाजाचे, गरजवंतांना गट निहाय आज स्वखर्चातून जीवनावश्यक वस्तूंच्या किट वाटप केल्या.सोबतच त्यांना हात खर्चासाठी पाचशे रुपये रोख देण्यात आले.
जिल्ह्यामध्ये लॉक डाऊनचा काळ कमी व्हावा, जिल्हा अंतर्गत व्यवसाय सुरू व्हावे, शारीरिक दुरी राखून व्यवहार सुरू व्हावेत, यासाठी आपण प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे पुढील काळात कोरोना आजाराचा प्रसार होणार नाही. यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहनही,त्यांनी केले.
व्यक्तिगत स्तरावर ही मदत दिली जात असून शासनाच्या विविध योजना मार्फतही गरजू, गरीब व आवश्यक जनतेपर्यंत अन्नधान्यांचे वाटप केले जात आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही वडेट्टीवार यांनी यावेळी केले. ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष रेखाताई उराडे, सिंदेवाही नगराध्यक्ष आशाताई गंडाते, जि.प. सदस्य राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, हेमराज तिडके, रमाकांत लोदे, सीमाताई सहारे, प्रभाकर शेलोकार, बाळाभाऊ राऊत, सुनील उटलवार, स्वप्नील कावडे, नितीन उराडे आदींनी या वाटपाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment