घटना आज्यानेच केला नातीनवर बलात्कार!
मानुसकीला काळीमा फासणारी घटना,
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर : चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डातील प्रांतिक कॉलनी येथे एका नराधमाने सख्या नातेवाईकाने नाबालिकेवर अतिप्रसंग केला. उमेश शिल नावाचा या निर्दयी व्यक्तीवर आपल्या सख्ख्या मोठ्या भावाच्या मुलीच्या मुलीवर (नातीन) अतिप्रसंग केल्याच्या आरोपाखाली शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून 376, पास्को अंतर्गत उमेश शिल यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक भिवापूर वॉर्डात उमेश शील याचे कंटीगचे दुकान आहे. प्रांतिक कॉलनी बंगाली कॅम्प परिसरात यांचे राहणे असून आरोपी उमेश शील या लिंगपिसाट नराधमाने सख्खे मृत मोठे भाऊ यांच्या मुलीच्या आठ वर्षाच्या मुलीवर हा अतिप्रसंग करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चारित्र्यहीन उमेश शील याने आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीवर हा अत्याचार केल्याची वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार अतिप्रसंग झालेली मुलगी ही मंदबुद्धी होती. उमेश वेळ प्रसंग पाहुन या मुलीला लालच देऊन आपल्या नविन बांधलेल्या बायफास वर असलेल्या घरी घेऊन गेला. आणि तिच्यावर हा अतिप्रसंग केला. अत्यंत लाजिरवाणी असणाऱ्या या घटनेने या परिसरात असंतोष पसरला आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार भिवापूर वार्डामध्ये असलेल्या त्याच्या सलूनच्या दुकानांमध्ये या मुलीला आणून ठेवत असल्याची माहिती ती मिळाली आहे. मुलीचे आई-वडील हे मोलमजुरी करणारे असून या प्रसंगामुळे ते मानसिकरित्या खचलेले आहेत. महत्वाचे म्हणजे उमेश शील हा अनेक मोठ्या व्यक्तींच्या संपर्कात होता, त्यांच्या शरीराची मालिश करण्यापासून तर त्यांचे "वाह्यात" शौक पूर्ण करण्यापर्यंत चा व्यवसायात सुद्धा तो असल्याचे बोलल्या जात आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी योग्य तपास केल्यास अनेक अविश्वसनीय कारनामे उघडकीस येऊ शकतात. अंधविश्वासात लिन असलेला उमेश शील हा अनेक ठिकाणी जुडला होता, अशी चर्चा परिसरात होऊ घातली आहे. चंद्रपूरचे कर्त़व्यदक्ष पोलिस अधीक्षक यांनी प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतल्यास या प्रकरणाला वेगळे वळण मिळू शकते.मात्र या हद्घय हेलावून टाकणा-या घटनेने खळबळ उडाली असून मानुसकीला काळीमा फासणारी घटना आहे.
About The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment