Ads

कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू, शहरातील रहमत नगर येथील रहिवासी





कोरोनामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पहिला मृत्यू, शहरातील रहमत नगर येथील रहिवासी

दिनचर्या न्युज :-

आतापर्यंत ३३८ बाधित बरे ;१९८ वर उपचार सुरू

चंद्रपूर दि. १ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज १ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ३० जुलै या ४२ वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण ३०जुलैला रात्री अकरा तीस वाजता दाखल झाला होता. ३० जुलैला गंभीर अवस्थेत रात्री ११.३० वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक ऑगस्ट पर्यंत ५३६ कोरोना बाधित असून त्यापैकी ३३८बरे झाले आहेत. तर १९८ जणांवर सध्या उपचार सुरू आहे
.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment