मागील 24 तासात जिल्ह्यात कोरोनामुळे सहा मृत्यू
212 नव्याने पॉझिटिव्ह ; 178 जणांना सुटी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 19 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे सहा मृत्यू झाले असून 212 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 13 हजार 612 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात 178 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 10 हजार 454 झाली आहे. सध्या 2 हजार 953 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात आतापर्यंत 1 लाख 9 हजार 729 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 94 हजार 841 नमुने निगेटीव्ह आले.
आज मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपुर शहरातील विजय नगर तुकुम येथील 55 वर्षीय पुरुष, सिस्टर कॉलनी परिसर येथील 70 वर्षीय पुरुष, राजुरा शहरातील नेहरू चौक येथील 65 वर्षीय पुरूष, राजुरा तालुक्यातील खामोना येथील 50 वर्षीय पुरुष, भद्रावती शहरातील श्रीकृष्ण नगर येथील 64 वर्षीय पुरुष तसेच भद्रावती तालुक्यातील शेगाव खुर्द येथील 64 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 205 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 194, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ पाच आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय बाधितांची संख्या:
जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 101 बाधित, पोंभुर्णा तालुक्यातील दोन, बल्लारपूर तालुक्यातील दोन, चिमूर तालुक्यातील एक, मुल तालुक्यातील 50, कोरपना तालुक्यातील सहा, ब्रह्मपुरी तालुक्यातील 10, वरोरा तालुक्यातील 16,भद्रावती तालुक्यातील 14, सावली तालुक्यातील एक, सिंदेवाही तालुक्यातील सात, गडचिरोली व वणी-यवतमाळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 212 बाधित पुढे आले आहे.
या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:
चंद्रपूर शहरातील व परिसरातील रामनगर, तुकूम, रयतवारी, श्यामनगर, छत्रपती नगर, राष्ट्रवादी कॉलनी परिसर, महेश नगर, सरकार नगर, घुटकाळा वार्ड, एकोरी वार्ड, बालाजी वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, जटपुरा वार्ड, बाबुपेठ, दुर्गापुर, नकोडा,पडोली, गंजवार्ड, सौगात नगर, कृष्णा नगर, विवेक नगर, आनंदनगर, बालाजी वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.
ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील बोर्डा, विनायक लेआउट परिसर, जिजामाता वार्ड, आनंदवन, कृषी नगर, देशपांडे लेआउट परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेढंकी, सुंदर नगर, झाशी राणी चौक परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील छत्रपती लेआउट परिसर, नवीन सुमठाणा, डिफेन्स चांदा परिसर, झिगुंजी वार्ड, शिवाजीनगर,पिपरबोडी, सुरक्षा नगर,परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.
सावली तालुक्यातील हनुमान मंदिर मुखाडा भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील नेताजी वार्ड भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील जुनासूर्ला, हिमालया राईस मिल परिसर, मारोडा, वार्ड नं.16, परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. कोरपना तालुक्यातील माणिकगड सिमेंट कॉलनी परिसर, गडचांदूर भागातून बाधित पुढे आले आहे.
00000
0 comments:
Post a Comment