Ads

दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रिया आजपासून तीन ठिकाणी सुरू !





दारूविक्री परवाना नूतनीकरण प्रक्रिया आजपासून तीन ठिकाणी  सुरू! 

स्वीकारणार अर्ज : नवीन परवाना धारकांनाही करता येणार अर्ज

दिनचर्या न्युज

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय झाला. सहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. आता
राज्य शासनेने अधिसूचना जारी केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या तीनही खंडपीठात कॅवेट दाखल करण्यात आले. आता उत्पादन शुल्क विभागाने ३१ मार्च २०१५ पर्यंत परवानगी असलेल्या दारूविक्री परवानाच्या नूतनीकरणाचे काम सुरु केले आहे. १६ जून २०२१ पासून चंद्रपूर, वरोरा आणि राजुरा येथे अर्ज स्वीकारले जाणार आहे. यासोबतच नवीन परवाना धारकांनाही अर्ज करता येणार आहे.
गृह विभागाने ८ जून २०२१ रोजी अधिसूचना काढून परवाने नुतणीकरणाचा आदेश दिला. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कार्यालयाकडून आदेश जारी करण्यात आले. अर्ज स्वीकारण्यासाठी तीन विभागांची निश्चिती झाली. अर्ज प्राप्तीची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीकडून अर्जाची छाणणी होईल. त्यानंतरच पुढील प्रक्रिया होणार आहे.
-सागर डोमकर, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर
दर्शविली. त्यानंतर जिल्हाधिकाण्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दारूबंदीचा अभ्यास केला त्यानंतर निवृत्त सचिव रमानाथ झा समितीनेसुद्धा दारूबंदीचा अभ्यास केला.
या समितीच्या अहवालानंतर राज्य शासनाने जिल्ह्यातील दारुबंद उठविण्याचा निर्णय घेतला.
यातून जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याची चर्चा जोर धरू लागली. त्यानंतर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पालकमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील दारूबंदी उठविली जाईल, असे उघडपणे वक्तव्य केले. दारूबंदी उठविण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनीसुद्धा दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली नाही. त्यामुळे बंदीच्या काळात कोट्यवधी रुपयांच्या दारूची अवैध विक्री जिल्ह्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली. हजारोच्या संख्येने नवीन गुन्हेगार तयार झाले. बालकांपासून प्रोढा पर्यंत या व्यवसायात गुंतले गेले होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment