वाहतूक नियंत्रण विभागाचा "तो-राम-दास "हप्तेखोर कर्मचारी
करतो लाखोंची वसुली?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील वाहतूक शाखा ही वाहनावरील नियंत्रण व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस विभागातील एक यंत्रणा आहे. वाहतूक शाखेतील "तो-राम - दास"! एका कर्मचाऱ्याची नियुक्ती ही फक्त अवैध धंदेवाल्या कडून हप्तेखोरी वसुलीसाठी झाली का? असा प्रश्न चर्चेला जात आहे. याला फक्त अवैध धंद्यातील रेती, मुरूम, ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्ट, ऑटो, प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळी पिवळी या धंदेवाल्या कडून लाखोची हप्ता वसुली? सुरु असल्याची खमंग चर्चा शहरात सुरू आहे. या कर्मचाऱ्यावर वरिष्ठांचे पाठबळ असल्याने करोडोची माया जमवली आहे. नियंत्रण शाखा ही सुव्यवस्था म्हणजे जनतेच्या संरक्षणार्थ प्रमुख आधार असतो. हे सर्वांना परिचित आहेत. पोलीस हे अधिकांश पोलीस नियंत्रणतील खरे कर्तुत्वावर उतरतात. मात्र काही एखाद्या सडक्या आंब्या सारखे प्रतिमा मलीन करतात.
अवैध धंद्यात असणाऱ्या कडून हप्ता वसुली करणारा हा महाशय सध्या वाहतूक शाखेत चांगलाच चर्चेत आहे. याने चांगलेच चांगभलं केले असून अवैध धंदेवाईक यांच्याकडून व्यक्तिगत हप्ता वसुली करीत असून या संपूर्ण कामकाजाची माहिती निरीक्षकांना नसावी हेच खरे कोळे असून, पोलीस खात्याला बदनाम होण्यापासून रोखण्यासाठी गेडाची त्वरित उचलबांगडी करण्यात यावी व त्याच्या जमा केलेला संपत्तीची सखोल चौकशी करण्यात यावी.
0 comments:
Post a Comment