🤦♂गडचांदूरकरांनो घ्या "भोगा आता कर्माची फळ"
🥃दारू दुकानाला ना-हरकतचा ठराव मंजूर.
🤜"भाजप,शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला कडाडून विरोध"
दिनचर्या न्युज :-
गडचांदुर:-
महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते.परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अशाप्रकारचे अर्ज नसताना स्वतःच्या अधिकाराने २० जुलै रोजी दुपारी १.३० वा.सभेचे नोटीस सदस्यांना देवून सभा लावली.त्यात एकूण ५ विषय ठेवले असून त्यातील विषय क्रं.४ व ५ हेच विषय नगराध्यक्षासाठी अती महत्वाचे असल्याचे लक्षात येत आहे.जेव्हा की मागील महिन्यात सर्वसाधारण सभा १७ जून रोजी झाली.असे असताना आता सर्वसाधारण सभा लावता आली असती मात्र दारू दुकानाकरीता त्या अर्जदारा सोबत झालेल्या गुप्त करारामुळे नगराध्यक्षा व सत्ताधारी नगरसेवकांना मोठी घाई सुटली व लगेच त्यांनी २० जुलै रोजी तातडीने विशेष सभा लावली.ती केवळ आणि केवळ दारू दुकानाचे नाहरकतसाठी लावल्याचे आरोप विरोधी पक्ष नगरसेवकांनी केला आहे.यातील विरोधी पक्ष भाजप नगरसेवक अरविंद डोहे यांनी मुख्याधिकाऱ्यांना सदरची सभा नियमबाह्य असल्याने सभा रद्द करण्यासाठीचे विनंती अर्ज दिले.परंतू यांच्या अर्जाला मुख्याधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली.एवढेच नव्हे तर विरोधी नगरसेवकाला सभेची टिपनी सुध्दा दिली नाही.तेव्हा विरोधी नगर सेवकांनी "टिपनी नाही तर सभा नाही" अशी ओरड करत सभा रद्द करण्याची मागणी केली.परंतू सत्ताधाऱ्यांचे दारू दुकानासाठी नाहरकत देण्याचा धाडस बघून मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा विरोधी नगरसेवकांच्या मागणीकडे काणाडोळा केल्याचे आरोप विरोधी नगरसेवकांनी केले आहे.तेव्हा विरोधी नगरसेवकांनी सभेची टिपणी नसताना सभा कशी काय घेता ? असे विचारता त्या सभेत वेळेवर सभेत टिपणी दिली त्यावेळी सुध्दा नगरसेवक डोहे यांनी लेखी आक्षेप घेतला.परंतू नगराध्यक्षा तसेच सत्ताधारी नगरसेवकांचे दारू व्यवसाय सोबत संगनमत असल्याने विरोधकांच्या लेखी,तोंडी आक्षेप तसेच प्रभागातील महिलांच्या आक्षेपाला बगल देत सत्ताधाऱ्यांनी एकमताने ठराव मंजूर केला.त्यावेळी भाजपाचे व शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केला.सदरचा ठराव जरी सत्ताधाऱ्यांनी मंजूर केला असला तरी विरोधी नगरसेवक सदर ठरावावर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील करण्याचे मत व्यक्त केले आहे.तेव्हा सदरचे नाहरकत ठराव हरकत ठरू शकतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार,सरवर भाई,सौ. रजीया शेख ख्वाजा हे तीन सदस्य अनुपस्थीत होते.तर भाजपाचे अरविंद डोहे, रामसेवक मोरे,व शिवसेनेच्या नगरसेविका सौ.गोरे,सौ.कोडापे,सौ.अहीरकर यांनी सभेला उपस्थीत राहून शहरात जुनीच दारू दुकाने भरपुर आहे व आणखी दारू दुकानांना ना-हरकत देवून शहरात दारूचा महापूर आणता का ? असा टोला अध्यक्ष व सत्ताधाऱ्यांना हाणला.परंतू ती मंडळी दारू दुकानाचे ना-हरकतच्या जणु नशेत असल्याने काहीही न ऐकता व बोलता ठराव मंजूर केला.त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघितला असता शहरात फार मोठे विकास कामाचा ठराव घेतल्याचे जानवत असल्याचे मत विरोधी नगरसेवकाने व्यक्त केले आहे.
0 comments:
Post a Comment