चालकाने साथीदारांना घेऊन मारला लाखोंचा डल्ला, पण पोलीसांनी चोवीस तासांच्या आत ठोकल्या बेड्या!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर शहरातील झालेल्या घरफोडीचा पळदापास करण्यात पोलिसांना यश आले. असले तरी शहरात चोरीचे प्रकाराचा सातत्याने वाढ होत आहे.चालकाने साथीदारांना घेऊन मारला लाखोंचा डल्ला, पण पोलीसांनी चोवीस तासांच्या आत ठोकल्या बेड्या! काल येथील शिवाजीनगरातील प्रकाश जयस्वाल यांच्या घरी 43 लाखांची चोरी करण्यात आली. या घटनेतील चोरट्यांना २४ तासाच्या आत बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने २, तर रामनगर पोलिसांनी ३ चोरट्यांना अटक केली आहे.
प्रकाश जयस्वाल यांच्याकडे चालक म्हणून काम करणाऱ्या सादिक या युवकाला ६ महिन्यांपूर्वी कामावरून काढण्यात आले. त्यामुळे सादिक आणि जयस्वाल यांच्यात घटनेच्या आदल्या दिवशी पैशावरून वाद झाला होता. त्यानंतर सादिक याने आपल्या सहकाऱ्यांसह चोरीचा प्लॅन आखला.
त्यानुसार घरी कुणीही नसल्याची संधी साधून घरात प्रवेश केला आणि घरातील १५ लाखांची रोख आणि ७० तोळे सोन्याचे दागिने असा ३७ लाखांचा ऐवज लंपास केला.
या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने दोघांना, तर रामनगर पोलिसांचा गुन्हे शोध पथकाचे प्रमुख हर्षल ऐकरे व अब्दुल मलिक यांचा पथकाने तीन चोरट्यांना अटक केली आहे. शहरातील गोल बाजार परीसरातील एका बारमधून दोन, गडचिरोली येथून एक आणि नागपुरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले.
0 comments:
Post a Comment