शोषखड्डे निर्मितीकरिता स्थायित्व व सुजलाम अभियान
100 दिवसात 40 हजार शोषखड्डे निर्माण करण्याचा मानस - डॉ. मिताली सेठी
दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर (प्रतिनिधी) दिनांकः 16/09/2021 भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हयामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत अभियानांतर्गत पुढील 100 दिवसांत हागणदारीमुक्त शाश्वतता टिकविणेसाठी चंद्रपुर जिल्हयात स्वच्छ भारत मिशन (ग्रामिण) अंतर्गत स्थायित्व व सुजलाम अभियान राबविण्यात येणार असुन, 100 दिवसाच्या अभियान कालावधी जिल्ह्यात 40 हजार शोषखड्डे निर्माण करण्याचा मानस आहे. अभियान कालावधीत चंद्रपुर जिल्ह्यातील प्रत्येक गावात जास्तीत जास्त शोषखड्डे निर्माण करण्याचे आवाहन चंद्रपुर जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी यांनी केले आहे.
लोकसहभागाच्या माध्यमातुन सामुदायिक स्तरावर हागणदारीमुक्त शाश्वततेचे परिणाम अधिक प्रभावीपणे साध्य करणेसाठी आणि ग्रामीण भागात शोषखड्यांच्या निर्मितीतुन सांडपाणी व्यवस्थापन करणे, याबाबींचा समावेश आहे. जिल्हयात अभियान कालावधीत किमान ४० हजार शोषखड्डे तयार करण्याचे लक्ष निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंचायत समिती निहाय्य 3 हजार शोषखड्यांचे उदिष्टे निश्चित करण्यात आले असुन, उद्दिष्टापेक्षा जास्त काम करता येईल.
हागणदारीमुक्तीची शाश्वतता टिकविणे आणि सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक इतक्या शोषखड्डयांचे बांधकाम पूर्ण करणे, यासाठी ग्रामपंचायतींनी ठराव मंजूर करावा. हागणदारीमुक्तीची (ओ.डि.एफ.) शाश्वतता टिकविणे आणि नियोजित शोषखड्डयांच्या बांधकाम करणे यासाठी १०० दिवसांचा आराखडा प्रत्येक ग्रामपंचायत तयार करणार आहे. नादुरुस्त शौचालयांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे. नादुरुस्त शौचालय अंतर्गत शौचालय दुरुस्त करण्यासाठी कुटुंबांची निवड करण्यासाठी व्दितीयस्तर हागणदारीमुक्ती ग्रामपंचायत पडताळणी पुर्ण करावी. तसेच सर्व नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करावी. सदर अभियानाबाबत लोकांना माहिती देण्यासाठी व सहभागासाठी आणि कृतीत उतरविण्यासाठी गावस्तरावर सभा , गटचर्चेच्या माध्यमातुन अभियानाची जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाचे जिल्हास्तरावरून संनियंत्रण करणेसाठी अभियान कालावधी मध्ये जिल्हास्तरावरील जिल्हा कक्ष आणि विविध विभागांचे खाते प्रमुख यांच्या क्षेत्रिय भेटी होणार आहेत. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ मार्गदर्शिके प्रमाणे हागणदारीमुक्त शाश्वतता आणि शोषखडयांचे बांधकाम यासाठी लागणारा निधी १५ वा वित्त आयोग ,मनरेगा किवा स्वच्छ भारत मिशन यांच्या माध्यमातुन उपलब्ध केला जाणार आहे.याशिवाय गावस्तरावर श्रमदान व लोकसहभागाची मोहिम राबवुन शोषखड्डे निर्माण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे.
पुर्ण झालेल्या शोषखडयांची ( वैयक्तिकस्तर व सार्वजनिक स्तर ) माहिती स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत उपलब्ध असलेल्या SBM-२.० मोबाईल अॅप्लीकेशन मधुन नोंदीत करावी. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतींने पाठपुरावा करून, १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान यशस्वी होईल, यादृष्टीने तात्काळ कार्यावाही करण्याच्या सुचना सर्व गटविकास आधिकारी यांना देण्यात आल्या आहेत .
उघड्यावरील सांडपाण्याची गावस्तरावर मोठी समस्या असुन,यापासुन विविध आजारांना बळी पडावे लागते. यासाठी प्रत्येक घरी शोषखड्डा तयार करणे ही खुप महत्वाची उपाय योजना होईल. याकरिता जिल्हयात १०० दिवसांचे स्थायित्व व सुजलाम अभियान अंतर्गत जिल्हयात ४० हजार शोषखडे निर्मिती करणार असुन, उद्दिष्टापेक्षा जास्त शोषखड्यांची कामे जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभियान कालावधीत करावी. - डॉ. मिताली सेठी ,मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपुर . |
0 comments:
Post a Comment