बल्लारपूर बामणी राजुरा रोड वर झालेला अपघात हा जाणीवपूर्वक, रिव्हर्स घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न अपघातग्रस्त व्यक्तीचे मनने!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:-
जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी-राजुरा कडे जाणाऱ्या रोडवर शनिवारला mh49 0262 हा कंटेनर चालकाने बेसावध, मद्यपाश प्राशन करून असल्याने तसेच प्रत्यक्ष दर्शनी विचारणा केली असता वाहन चालक हा क्लीनर असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटला गेले. व समोरील खड्डा असल्याने चुकवण्याच्या नांदात समोरील चारचाकी वाहनाला जबरदस्त धडक दिली.ऐवढेच नाही तर त्याने कंटेनर रिव्हर्स घेऊन जीव घेण्याचा प्रयत्न केला. असे अपघातग्रस्त व्यक्तीचे मनने! अपघात ऐवढा मोठा होता की, यात जिवित हानी पण होवु शकली असती जर वेळेवर उपचार मिळाले नसते तर!
वाहन चालकासह त्यातील एकाला व दुसऱ्या गाडीतील दोघांना जबरदस्त अपघात झाला असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त असून प्रत्यक्षदर्शींनी अपघातग्रस्तांना विचारणा केली असता हा अपघात वाहन चालकाच्या नशेत असल्याने किंवा त्याला वाहन चालवण्याचा परवाना नसल्याने झाल्याचे म्हटले आहे. यात अपघात ग्रस्ताचे वाहनासह त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असुन लाखोचा खर्च करावा लागत आहे.
बल्लारशाह रोड अपघातातील सत्य उघडण्याचे पोलीसा समोर आव्हान!
शनिवार दिनांक ११/०९/२०२१ रोजी बल्लारशाह राजुरा मार्गावर एक भिषण अपघात झाला. वस्तुस्थिति प्रत्यक्षात जाऊन अपघात स्थळी चौकशी केली असता गाडी क्र. मारोती.MH /33/A1987 व गाडी न.MH/AR2318 हिला ज्या कंटेनर क्रMH49/0262 मुळे आमोरासआमोर धडक बसली त्या कंटेनरचा ड्रायव्हर कदाचित कंटेनर चालक नसावा असे प्रत्यक्ष दर्शी बऱ्याच लोकांचे मत आहे.किवा तो मद्यप्राशन केलेला असावा अशा प्रकारचे नियंत्रण सुटणे म्हणजेच लोकांचे जीव घेणे हा प्रकार असू शकते तसे नाकारता येत नाही! त्याचे कारण असे की, ड्रायव्हरला रस्त्यात गड्डे असल्याने संतुलन बिघडले की ,तो नाईलाजास्तव त्याच्या समोर अपघात होतो याचे भान नसते . परंतू वारंवार ती चूक तो परत परत करत नाही. MH49 0262 हा कंटेनर नागपूर पासिंग असून त्या कंटेनरने समोरून येणाऱ्या मारुती.mh 40/AR/218/ह्या गाडीला आमोरासामोर धडक दिल्यानंतर ही वाहन चालक हेतुपुरस्सर त्या मारुती गाडी मध्ये बसलेल्या प्रवाशांवर परत एकदा कंटेनर चढविण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ असा की, त्या कंटेनर चालकास कुठली तरी भिती असावी वा त्याच्याकडून झालेल्या चुकिवर त्याला पडदा टाकायचा होता म्हणून हेतुपुरस्सर त्याने परत एकदा त्या मारुती मध्ये बसलेल्या प्रवाशांचा जीव घेण्याचा क्षणातच बेत आखला हा खुप मोठा प्रश्न उपस्थीत होतो.
म्हणून सर्व तर्क वितर्क लक्षात घेता . बल्लारपूर शहर जे चंद्रपूर जिल्ह्याचे अपराधिक माहेरघर म्हणून गेल्या काही दिवसात नावारुपास आले त्यात हा पण कुठेतरी वेगळा बेत नसावा ना असा संशय येतो. कारण मारुती मध्ये बसलेले लोकं हे अगदी सर्वसाधारण घरातील असून ते एका महत्त्वाच्या बैठकी करिता चंद्रपूर वरून राजुरा करिता निघाले होते. अर्थात राजुरा बल्लारपूर मार्ग हा अवजड वाहनासाठी ओळखल्या जातो परंतू कुठल्याही वाहन चालकाने गाडी रिव्हर्स घेऊन परत त्या वाहनाला जबरण धडक दिली असल्याची ऐकावीत नाही.
म्हणून कुठेतरी हया अपघातात षडयंत्र तर नसावे. असा प्रश्न येतो.
यासंदर्भात बल्लारपूरचे पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना विचारणा केली असता . संबंधित अपघात ग्रस्ताचे बयान नोंदवून संबंधित वाहन चालकावर व वाहन मालकावर गुन्हा नोंदवला जाईल असे सांगण्यात आले. या प्रकरणात पोलीस प्रशासन सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करून संबंधित अपघातग्रस्तांना न्याय व त्यांना येणाऱ्या खर्चाची भरपाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच वाहन चालकासह गाडीमालकावर कारवाई करण्याची मागणी अपघात ग्रस्त व्यक्तींनी केली आहे.
दिनचर्या न्युज
0 comments:
Post a Comment