. भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे की काय, गडचांदूर नगरपरीषद, चौकशी केल्यास अनेक गबाळ बाहेर येण्याची शक्यता!
आता तर हद्द झाली!
!! बापरे बाप ---- काय म्हणावे तरी यांना !!
!! नुकतेच --- पाणी टाकी,घनकचरा व्यवस्थापन पाठोपाठ आता ओपन जिम चर्चेत.!!
दिनचर्या न्युज :-
गडचांदूर:-
कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषद नेहमी नाना कारणाने चर्चेत असते.यामध्ये येथील आरोग्य तथा पाणी पुरवठा विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर यांचा मोठा सिहाचा वाटा असल्याचे बोलले जात आहे.येथील नवीन पाण्याच्या टाकीचे काम सिव्हिल इंजिनिअर कडे काम न सोपविला स्वतः कडे ठेवून निष्कृष्ठ दर्जाचे काम करून केलेला भ्रष्ट्राचार , घनकचरा व्यवस्थापन ठेक्याचा भ्रष्ट्राचार,याची चौकशी पाठोपाठ आता लाखोंचे ओपन ग्रिनजिम चर्चेत आहे.नगरपरिषदेत विरोधी पक्ष भाजप नगरसेवकांसह शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार ,नगरसेवक,नगरसेविका यांनी १४ सप्टेंबर रोजी शहरातील समस्त ओपन जिमचा पाहणी दौरा केला होता.तेव्हा यांना याठिकाणी अनेक त्रुटी आढळून आल्याची माहिती आहे.
भ्रष्टाचाराचे माहेर घर आहे की काय गडचांदूर नगरपरीषद, चौकशी केल्यास अनेक गबाळ बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.?
यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रार करून चौकशीची मागणी करणार असल्याचे कळते.असे झाल्यास पिदुरकर यांना पुन्हा एका नवीन प्रकरणात चौकशीसाठी सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही ?
विरोधी नगरसेवकांच्या या दौरा संबंधी सविस्तर असे की,गडचांदूर शहरातील ओपनस्पेसवर ओपन जिमच्या उभारणीसाठी मागील १६ मार्च २०२० रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात आला.व आवश्यक मंजुऱ्या घेऊन जिम साहित्य फिटिंगचे काम शहरातील ओपन स्पेस वर करण्यात आले.पंधरा दिवस होत नाही अशातच शहरातून अनेक नागरिकांच्या तक्रारी विरोधी नगरसेवक कडे प्राप्त झाल्या की जे साहित्य लावण्यात आले ते साहित्य अत्यन्त निष्कृष्ठ दर्जाचे लावण्यात आले आताच काही साहित्य तुटून पडले आहे व काहीं साहित्य तुटण्याच्या स्थितीत आहे अश्यातच न कळत लहान मुलांचा अपघात वा दुर्घटना सुद्धा घडू शकते अशा तक्रारी प्राप्त झाल्याने भाजपा व शिवसेना नगरसेवक यांनी मौक्का पाहणी दौरा दि १४ सप्टेंबर ला आयोजित केला त्या पूर्वीच विभाग प्रमुख यांना उपस्थित राहण्या करिता पाचारण केले.परन्तु त्यांना ऐन वेळेवर महत्वाचे काम आल्याने उपस्थित राहू शकत नाही अशी भ्रमणध्वनी वरून सांगितले तेव्हा विरोधी नगरसेवक व ओपन जिम परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना सोबत घेऊन संपूर्ण शहराची पाहणी केली असता
खरोखरच नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळले.
लावण्यात आलेल्या बहुतेक ओपन जिम हे मंजूर स्थळी न लावता.स्वमर्जीने इतरस्त्र लावण्यात आले.लावण्यात आलेले जिम साहित्य हे अत्यन्त निष्कृष्ठ दर्जाचे असल्याचे आढळले,काही ठिकाणी साहित्य तुटून पडलेले आढळले,फिटिंग करताना कमी काँक्रेट वापरण्यात आले त्यामुळे ते तुटून साहित्य हालत असल्याचे आढळले ,ठाणेकर लेआऊट मधील जिम साहित्य अक्षरशः चिखलात फिटिंग केल्याचे आढळले याची सविस्तर पाहणी करून "ओपन जिम मौका पाहणी अहवाल" तयार करण्यात आला.आणि त्यावर विरोधी नगरसेवक तथा जिम परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी स्वाक्षरी केली.आता सदरचा अहवाल जोडून तक्रार करणार असल्याची माहिती भाजपा व शिवसेना गटनेत्यांनी यांनी सदर प्रतिनिधी कडे दिली.येत्या आठ दिवसात मुख्याधिकारी तथा नगराध्यक्ष यांनी योग्य ती चौकशी करावी अन्यथा आपण सुद्धा या कामाच्या भ्रष्ट्राचारात सहभागी असल्याचे समजून आपल्या विरुद्ध वरिष्ठांकडे तक्रार करू वेळ पडल्यास आंदोलन करू असे मत भाजपचे गटनेता अरविंद डोहे व शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार यानी सदर प्रतिनिधी पुढे व्यक्त केले आता यावर मुख्याधिकारी काय निर्णय घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.विशेष म्हणजे विरोधी नगरसेवकांनी आता चालू असलेल्या कामाच्या नव्याने मौका पाहणी दौरा केल्याने निष्कृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या नगर परिषदच्या ठेकेदारांचे तारंबे उडाले असल्याची खमंग चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.
0 comments:
Post a Comment