Ads

जड वाहनांची वाहतूक बंद करण्याकरिता आम आदमी पार्टी द्वारा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले - अमित बोरकर


घुग्घुस :-
घुग्घुस शहरांमधून दिवसेंदिवस जड वाहनांची वाहतूक वाढतच चाललेली आहे. ज्यामुळे शहरातील प्रदूषणामुळे खूप झपाट्याने वाढ झालेली आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे.शहरातील मुख्य मार्गावरून कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. ज्यामुळे शहरातील नागरिकांना वेग वेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाली आहे त्यामुळे लहान लहान मुले हाच रस्ता ओलांडून जात असतात. यामुळे अपघात होण्याचे प्रमाण वाढलेले आहे. १३ सप्टेंबर २०२१ रोजी पोलिस स्टेशन घुग्घुस इथे जड वाहनांची वाहतूक बंद करण्याकरिता आम आदमी पार्टी द्वारा निवेदन देण्यात आले होते परंतु यावर अजून पर्यंत कुठलाही मार्ग निघालेला नाही आहे. त्यामुळे आज १४ ऑक्टोंबर २०२१ रोजी आम आदमी पार्टी द्वारा घुग्घूस शहरातून कोळशाच्या जड वाहनांची वाहतूक बंद करण्याकरिता रस्ता जाम करण्यात आला.  शहरातून कोळशाची वाहतूक सर्रास पने होत असून स्थानिक नगरपरिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. कोळशाची वाहतूक करण्याकरिता यांना शहारा बाहेरून जाण्याकरिता मार्ग आहे परंतु ०२ किलोमीटर अंतर वाचविण्याकरिता शहरातून वाहतूक केल्या जात आहे. याचाच निषेध करत आम आदमी पार्टी घुग्घुस द्वारा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलना मध्ये आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले
1) ट्रकान वर तिरपाल झाकण्यात यावी.
2) रस्त्यावर दिवसातून किमान 4-5 वेळ पाणी मारण्यात यावे.
3) रस्त्यावरील धूळ  दर रोज साफ  करण्यात यावी.
4) रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे.
        या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला देण्यात आले जर का या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर या पेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल. सोबतच एका आठवड्यामध्ये जर का या समस्सेचे निवारण करण्यात आले नाही तर आम आदमी पार्टी द्वारा उपोषण करण्यात येईल.
          त्यावेळी भिवराज सोनी, मयूर राईकवार,राजू कूड़े,राजेश चेडगुलवार, अमित बोरकर , अभिषेक सपडी ,सागर बिऱ्हाडे, आशिष पाझारे, विकास खाडे, प्रशांत सेनानी, थिरुमालेश,निखिल बारसागडे,संदीप पथाडे,रवी शंतलावार,अभिषेक  तालपेल्ली, रजत जुमडे,सोनू शेट्टियार, करण बिऱ्हाडे,धनराज भोंगळे, दिनेश पिंपळकर,हंसराज नगराळे,प्रशांत रामटेके,दीपक निपाने, पांडेजी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment