Ads

प्रियकराणे केला प्रियसीचे पतीचा खुन


चंद्रपुर :- 
आज दि. 16/10/2021 रोजी पो.स्टे. पडोली येथे सकाळ दरम्यान खबर मिळाली की, पो.स्टे. पडोली हद्दीतील सिनरर्जी वर्ल्ड परीसरातील मागील बाजूस एका अनोळखी पुरूषाचे प्रेत रक्ताचे थारोळ्यात पडून आहे. अशी माहिती प्राप्त झाली सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर मा.श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी व पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळावर तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली. घटनास्थळावर • पडून असलेला मृतक हा अनोळखी असून त्याचे अदर्याप पर्यंत ओळख पटलेली नव्हती तसेच घटनास्थळावर कुठलाही पुरावा किंवा हत्यार दिसून येत नव्हते.

सदर घटनेचे गांर्भीर्य पाहून संदरचा खुन हा गुंतागुंतीचा व क्लीष्ट असल्याने सदर गुन्हयाचा समांतर तपास करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक, बाळासाहेब खाडे यांना दिले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ तपास सुरू केला घटनास्थळावर एक 40 ते 45 वयाचा इसम रोडचे कडेला रक्ताचे थारोळ्यात पडलेला होता. बारकाईने पाहणी केली असता त्याचे डोक्यावर जबर जखमा दिसून आल्या. त्यावरूण सदर मृतकाची ओळख पटवण्याकामी स्थागुशा चे अधिकरी व कर्मचारी यांनी तपास सुरू केला. त्यावरून पथकाने दुर्गापूर, बंगाली कॅम्प, रैय्यतवारी, अष्टभुजा, प्रकाश नगर अशा विवीध भागात मृतकाचा घटनास्थळावरील फोटो लोकांना दाखवून अनोळखी मृतक ईसम कोण आहे या बाबत माहिती घेतली असता पोलीस उपनिरीक्षक, संदीप कापडे यांचे पथकास यातील मृतक हा राजू अनंत मलीक वय 45वर्षे व्यवसाय मजूरी रा. प्रकाश नगर, अष्टभुजा वार्ड चंद्रपूर हा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच गोपनिय सुत्रदारा कडुन माहीती घेतील असता त्याचे नाव राजू अनंत मल्लीक असल्याचे पृष्टी मिळाली.


स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार यांनी अधिक माहिती प्राप्त केली असता. मयत व त्याची पत्नी यांचेसह संशईत इसम नामे जितेंद्रसिंग भंडारी यांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे माहिती प्राप्त झाली. तसेच संशईत ईसम हा मयत व त्याचे पत्नीच्या सतत संपर्कात असल्या बाबत विश्वसनिय माहिती प्राप्त झाली. त्यावरून संशईत नामे जितेंद्रसिंग भंडारी याचे बाबत तांत्रीक तपास केला असता नमुद ईसमास दुर्गापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्यास ताब्यात घेवून स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात घेवून आलो व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे व पो. उपनि संदीप कापडे यांनी त्याचेकडे कसून चौकशी केली परंतू संशईत ईसम हा उडवा उडविचे उत्तरे देत होता. त्या नंतर त्याची उलट सुलट चौकशी केली असता त्यावरून त्याने दिलेल्या माहिती वरून यातील संशईत ईसमानेच खुन केला असल्याचा संशय बळावला त्यानंतर त्याला विश्वासात घेवून पोलीस भाषेत विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याचेकडे मयता बाबत चौकशी केली असता त्याचे मयताचे पत्नी बरोबर मागील 5 वर्षापासून प्रेमसंबंध होते. ती मागील 1 वर्षांपासून मुलासह तिचे माहेरी कान्केर राज्य छत्तीसगड येथे गेलेली आहे. त्या दोघांचे प्रेमसंबंधामध्ये मयत ईसम हा अडसर होत असल्याने त्याला ठार मारण्याचा निश्चय आरोपी ईसमाने केला. त्यावरून दि. 15/10/2021 चे रात्रौ 07:00 वा. दरम्यान आरोपीने मृतकास सिनरर्जी वर्ल्ड येथील निर्जन परीसरात नेवून त्याला दारू पाजली व त्यास लोखंडी रॉडने डोक्यावर मारून जिवानीशी ठार मारल्याचे कबुल केले.

सदरची यशस्वी कामगीरी मा.श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, सचिन गदादे, अतुल कावळे यांचे सह पो. हवा. संजय आतकुलवार स्वामी चालेकर, पंडीत व-हाडे, ना.पो.कॉ. गजानन नागरे, पो.शि. प्रशांत नागोसे, अमोल धंदरे, संदीप मुळे, रविंद्र पंधरे, नितीन रायपूरे कुंदसिंग बावरी, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, गणेश मोहूर्ले, दिपक डोंगरे, प्रशांत धुडगंडे, चानापोशि. दिनेश अराडे यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment