भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-रोटरी क्लब भद्रावती व बॅडमिंटन बॅडमिंटन क्लब भद्रावती तर्फे शिंदे महाविद्यालयाच्या बॅडमिंटन कोर्टवर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .यामध्ये वीस स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत झालेल्या दुहेरी सामन्यात स्वप्निल डुकरे व चिन्मय काळबांधे या जोडीने विजेतेपद पटकावले तर राजेश नरवडे व अविनाश सिद्धमशेट्टी वार या जोडीने उपविजेतेपद प्राप्त केले. बक्षिस वितरण समारोह प्रसंगी डॉक्टर विवेक शिंदे, नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,डॉक्टर कुटेमाटे, जाफर भाई,रोटरी क्लब भद्रावती चे अध्यक्ष प्रा. सचिन सरपटवार ,सचिव अब्बास अजानी तसेच पदाधिकारी भाविक तेलंग, सुनील पोटदुखे ,आनंद क्षीरसागर, मदन ताठे, आकोजवार ,प्रकाश पिंपळकर ,सुधीर पारोधे ,रोहित रॉय ,बबलू सारडा ,ललित बैद ,प्रतीक वानखेडे वा अन्य सदस्य उपस्थित होते.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment