Ads

*मायनिंग चे शिक्षण घेतलेल्या युवकांनी मानले आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार*


चंद्रपुर :-
आमदार किशोर जोरगेवार यांच्या आंदोलनानंतर वेकोली प्रशासनाने २११ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामूळे मायनिंगचे शिक्षण घेवूनही रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या युवकांना वेकोलि मध्ये नौकरीची संधी प्राप्त झाली आहे. दरम्याण मायनिंगचे शिक्षण घेतलेल्या युवकांनी आज आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत पूष्प गुच्छ देत त्यांचे आभार मानले आहे. यावेळी मायनिंग कम्युनिटीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती होत
चंद्रपूरात अनेक कोळशाच्या खाणी आहेत. त्यामूळे या खाणींमध्ये नौकरी मिळेल या आशाने युवकांनी मायनिंग क्षेत्रातील महागडे शिक्षण घेतले. मात्र २०१८ पासून वेकोलिच्या वतीने मायनिंग सरदार आणि सर्वेअर हे पदे भरण्यात आलेली नव्हती. त्यामूळे मायनिंग शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांवर बेरोजगारीचे संकट ओढावले होते. यात अनेकांची वयोमर्यादा वाढत असल्याने सदर नौकरी कायमची गमविण्याचे संकटही या युवकांवर ओढावले होते. वेकोलि प्रशासनाने सदर पद भरती प्रक्रिया कोलकत्ता येथे राबवून तेथील युवकांना येथे पदभार देण्याचा कट वेकोलि प्रशासनाकडून आखल्या जात होता. त्यामूळे या विरोधात ५ जानेवारी २०२१ ला आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने नागपूर येथीली वेकोलिच्या सिएमडी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मायनिंग सरदार आणि सर्वेअर पदाच्या जागा तात्काळ भरण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली होती. मागणी मान्य न झाल्यास कोळसा खाण बंद पाडण्याचा ईशाराही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने वेकोलि प्रशासनाला देण्यात आला होता. याची दखल घेत वेकोली प्रशासनाने तात्काळ विभागीय जागा भरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विभागीय जागांसह सर्वसाधारण गटातीलही जागा भरण्याची मागणी रेटून धरली होती. या संदर्भात त्यांचा वेकोलि प्रशासनासह सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. मायनिंग सरदार पदासह इतर अशा २११ जागा भरण्याचा निर्णय वेकोली प्रशासनाने घेतला आहे. तशी जाहिरातही प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामूळे मायनिंगचे महागडे शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये रोजगाराची नवी आशा निर्माण झाली आहे. आज मायनिंगचे शिक्षण घेतलेल्या युवकांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात येत त्यांची भेट घेतली आहे. तसेच मायनिंग सरदार पदाच्या जागा काढण्यास वेकोलि प्रशासनाला बाध्य केल्याबदल पूष्पगुच्छ देवून त्यांचे आभार मानले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment