वरोरा ( प्रतिनिधि):-चेंबूर तुर्भे शिक्षण संस्थचे कलारंग प्रस्तुत अमृत धारा ही राज्यस्तरीय ऑनलाईन भजन स्पर्धा दि,१४/१०/२१ला आयोजित करण्यात आली होती. नवोदित कलाकारांचे हे हक्काचे व्यासपीठ आहे. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धकांनी, समूहांनी आपली कलाकृती सादर केली.यामध्ये प्रथम कु. भूमी जाधव ,मुंबई द्वितीय कु.सई पारखी ,वरोरा तृतीयश्री. चिकणे आणि दिक्षा जाधव मुंबई या स्पर्धकांनी क्रमांक पटकाविला . मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी प्रा. मोहनजीं प्रसाद, श्रीमती वैशाली दरेकर, प्रा. अनिताजी दाभोळकर परीक्षक म्हणून लाभले होते, विश्वस्त श्री. म्हापणकर सर यांनी कलारंग चे उदघाटन केले. या कार्यक्रमाच्या प्रारंभापासून संस्थेचे विश्वस्त
शैलेशजी आचार्य यांचे आश्वासक दिग्दर्शन लाभले. ना. ग. आचार्य आणि दा. कृ. मराठे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विद्यागौरी लेले यांनी मौलिक सहकार्य दिले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या जयश्री जंगले, पर्यवेक्षक शिजा नायर यांचा पाठिंब्याच्या आधारे प्रा. वंदना गायकवाड, प्रा. मृदुला वाघमारे, प्रा. भांडारकर. प्रा. हर्षाली वळवी, प्रा. प्रियांका काळढोणे, प्रा. हर्षदा मुद्रस या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी स्पर्धा उत्तम तऱ्हेने संपन्न झाली.
0 comments:
Post a Comment