Ads

पारडी - बाळापुर जि.प.क्षेत्रातील ग्रा.पं.ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप.

नागभीड :-
नागभीड तालुक्यातील पारडी - मिंडाळा- बाळापुर जि.प.क्षेत्राचे सदस्य संजय गजपुरे यांनी जि.प.च्या जिल्हा निधीतून आपल्या क्षेत्रातील १५ ही ग्रामपंचायत ला डिजिटल स्मार्ट युनिट चे वाटप करून ग्रामपंचायत ने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.
जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या द्वारे आता जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती आता नागरिकांना स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयात या डिजिटल स्मार्ट युनिट च्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. सोबतच व्हिडीओ कान्फरन्सच्या द्वारे थेट संवाद साधता येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना देश विदेशातील बातम्या सुध्दा यातून पाहता येणार आहे.
आपल्या जि.प.क्षेत्रात विविध निधीच्या माध्यमातून विकासासाठी कोट्यावधी रुपयांची विकासकामे आपल्या कार्यकाळात संजय गजपुरे यांनी करुन घेतली आहेत. मागील वर्षी जिल्हा निधीतून त्यांनी प्रत्येक ग्रामपंचायती ला ट्राली स्पिकर बाक्स चे वितरण केले होते. मागणीनुसार जिल्हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल जि.प.चंद्रपूर च्या अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांचे संजय गजपुरे यांनी आभार मानले आहे.
=====================
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment