Ads

सुधारीत बियाणांची परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करा

भद्रावती प्रतिनिधी :-
कापूस आणि सोयाबीन पिकाच्या सुधारित बियाणाना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत.तसेच २०१९ आणि २०२० मध्ये जाहीर केलेल्या ओल्या दुष्काळाचे पैसे शेतकऱ्यांना मिळवून देण्यात यावे.आणि पांधण रस्त्यासाठी निधी मंजूर करून देण्याबाबत अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष तथा माजी सरपंच संदिप अण्णाजी कुटेमाटे यांच्या नेतृत्वात आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.
विकसित देशात BG-VII या कपास वाणाची लागवड करत असताना आपल्या देशात अजूनही BG-II वाणाची लागवड करण्यात येत आहे.त्यामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे तसेच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.त्यामुळे सुधारित वणांना परवानगी मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.तसेच शेतात जण्या-येण्यासाठी त्रासदायक ठरत असलेल्या पांधण रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्याची मागणी करण्यात आली.आमदार सौ प्रतिभाताई धानोरकर यांनी या मागण्यांना प्रतिसाद देत सुधारित वाणाच्या लागवडीसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.तसेच पहिले मंजूर असलेल्या पांधण रस्त्याचे लवकरच काम सुरू होणार आहे असे सांगितले आणि नवीन पांधण रस्त्यासाठी आमदार निधीतून लवकरच निधी मंजूर करण्याची हमी दिली तसेच आपुलकीचे गावातील समस्याची विचारपूस केली.यावेळी संदिप कुटेमाते अध्यक्ष अन्नदाता एकता मंच, अनुप सुधाकर कुटेमाटे संस्थापक अन्नदाता एकता मंच,अमोल क्षिरसागर तंमुस समिती अध्यक्ष ,सौ सुनीता दर्वे ग्रा.पं.सदस्य,सौ कविता कुटेमाटे ग्रा.पं.सदस्य,मोहन दर्वे प्रचारक श्री गुरुदेव सेवा मंडळ आणि हेमंत बोबडे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment