ब्रम्हपुरी :-तालुक्यात सुरू असलेले अवैध उत्खणनाचे धंदे व त्यांना मिळणारा राजकीय व स्थानिक प्रशासनाचा आशीर्वाद यामुळे हे अवैध धंदे करणारे व्यवसायी जणू सैराट झाले असल्याचे सारखे पाहायला मिळत आहेत, तालुका महसूल प्रशासनात नव्याने रुजू झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तालुक्यातील नागरिकांना मोठी अपेक्षा होती मात्र सैराट झालेले अवैध व्यवसायी "कोतवाल हमारा तो डर काहेका" या उक्तीप्रमाणे मोठया अविर्भावात "चरणी चढावा" अपर्ण करून बिनधास्त अवैध तस्करी करण्यात मशगुल असल्याचे तालुक्यात खुल्लमखुल्ला बघितल्या जातं आहेत.
सर्वात सुरवातीला अकरा ट्रॅक्टर अर्हेर- नवरगाव रेती घाटावरून पन्नास ते साठ हजार रुपये "एन्ट्री" अशा भावाने सुरु करण्यात आले तर "नो ऑब्जेक्शन" नंतर उर्वरित ट्रॅक्टर मालकांना सुद्धा तस्करीसाठी समाविष्ट करून त्यांच्यासाठी सुद्धा "कल्याणकारी योजना " राबवण्यात येईल असे आश्वासन मिळाल्याची ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरिकांच्या चर्चेला उधाण असून सर्वत्र खमंग चर्चा केल्या जातं आहे
अधिकाऱ्यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर महिना भर सुद्धा ब्रम्हपुरी तालुक्याला न अभ्यासता अगदी काही दिवसात अश्या धाडसी "उपहार योजने" चा लाभ घेणाऱ्या अशा जबाबदार शून्य लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवरण्यात याव्या अशी भोळी आशा तालुक्यातील सर्वसाधारण जनता करत आहे.
0 comments:
Post a Comment