Ads

कोरोनामुळे बंद असलेल्या रेल्वे पूर्ववत सुरु करा.

चंद्रपूर :
जगभरात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वच क्षेत्रातून प्रतिंबंधात्मक उपायोजना करण्यात आल्या. शक्य त्या सर्व परींनी कोरोनाचा प्रादुर्भाव कशा प्रकारे कमी करता येईल यासाठी रेल्वे प्रशासनाने बंद केल्या होत्या. परंतु आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर कोरोनामुळे बंद असलेल्या रेल्वे पूर्ववत सुरु करा अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड यांच्याकडे केली आहे.

चंद्रपूर - वणी - आर्णी लोकसभा क्षेत्रांतर्गत मध्य रेल्वे, दक्षिण - पूर्व - मध्य रेल्वे तसेच दक्षिण - मध्य रेल्वे या ३ झोनचा समावेश आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्याकरिता रेल्वे विभागाने रेल्वेवर निर्बंध आणून अनेक रेल्वे बंद ठेवल्या होत्या. पॅसेंजर रेल्वे मधून मध्यम वर्गातील तसेच आर्थिक दृष्ट्या कमजोर वर्गातील प्रवाशांचा प्रवासासाठी सोईची होत असते. t-no-11402 NAGP TO CSMT NANDIGRAM ESP 2, T-no 51196 BPQ TO CSMT या रेल्वे गाड्या देखील पूर्ववत सुरु करण्याची लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी चेअरमन रेल्वे बोर्ड यांच्याकडे केली आहे. त्यासोबतच तिकिटावर लावण्यात येणारा अधिभार देखील रद्द करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. तसेच दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, विशेष रोगांनी ग्रस्त यांना देण्यात येणाऱ्या सोई सुविधा देखील पूर्वी प्रमाणे लागू करण्यात याव्यात अशा लोकहितकारी मागण्या त्यांनी केल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment