घुग्घुस प्रतिनिधी :-रविवार 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार घुग्घुस भाजपाच्या शिष्टमंडळाने वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक श्री. उदय कावळे यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन देऊन घुग्घुस शहराच्या बाहेरून कोळशाच्या जडवाहनाच्या वाहतुकीसाठी सुरु असलेल्या *जिओसी कोळसा खाण- कारगिल चौक मार्गे बेलोरा पूल पर्यंत नवीन मार्गाचे काम* तात्काळ पूर्ण करून लवकर हा रस्ता सुरु करण्याची मागणी केली.
वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढील महिन्याच्या *10 नोव्हेंबर पर्यंत हा रस्ता सुरु करण्यात येणार असल्याचे* आश्वासन दिले.
दिनांक 27 सप्टेंबर रोजी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, वेकोलीचे अधिकारी संजय वैरागडे, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, ठाणेदार राहुल गांगुर्डे यांची बैठक झाली. घुग्घुस शहरातून होणारी कोळश्याच्या जडवाहनांची वाहतूक ही शहराच्या बाहेरून सुरु करावी यासाठी चर्चा झाली.
दिनांक 28 सप्टेंबर रोजी वेकोली वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी संयुक्तरीत्या जिओसी कोळसा खाण मार्गे बेलोरा पूल पर्यंत रस्त्याची पहाणी केली.
त्याअनुषंगाने काही दिवसापूर्वी या नवीन रस्त्याचे काम वेकोलीने सुरु केले परंतु या रस्त्याचे काम संथगतीने सुरु असल्याने दिनांक 23 ऑक्टोबर रोजी या रस्त्याची पहाणी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उत्तर भारतीय मोर्चाचे संजय तिवारी, माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, भाजपाचे सुरेंद्र जोगी, यांनी केली होती.
काही महिन्यापासून घुग्घुस शहरातून कोळशाच्या जडवाहनांची वाहतूक दिवसरात्र मोठया प्रमाणात सुरु आहे त्यामुळे शहरात अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली तसेच प्रदूषणात वाढ झाली शहर वासियांसाठी हा मुद्दा महत्वाचा असल्याने ही मागणी करण्यात आली.
निवेदन देतांना भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, उत्तर भारतीय मोर्चाचे संजय तिवारी, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, अजय आमटे, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, धनराज पारखी उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment