चंद्रपूर प्रतिनिधी :-महानगर पालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत दहा मिनिटात तब्बल २३ विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नाराजी विक्रम केली. नवनियुक्त सभापती संदीप आवारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेली पहिलीच सभा वादग्रस्त ठरली.
स्थायी समितीमध्ये नव्याने आठ सदस्यांची नियुक्ती झाली. अध्यक्षपदी सत्ताधारी पक्षाचे संदीप आवारी यांची अविरोध निवड झाली. आवारी यांच्या अध्यक्षतेखाली आज 22 ऑक्टोंबरला स्थायी समितीची पहिली सभा घेण्यात आली. या सभेला महानगरपालिकेचे उपायुक्त अशोक गराटे उपस्थित होते. मात्र नवनियुक्त सदस्यांची पहिलीच सभा वादग्रस्त ठरली. विषयपत्रिकेवरील अर्धे विषयांचे वाचन करण्यात आले नाही. वाचन न करता विषयांना मंजुरी देण्यात आली असा आरोप स्थायी समिती सदस्य नंदू नागलकर व पप्पू देशमुख यांनी केलेला आहे. विशेष म्हणजे पाणीपुरवठ्याच्या देखभाल व दुरुस्तीच्या तीन निविदा आजच्या विषयपत्रिकेवर मंजुरीसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. नव्याने नियुक्त झालेल्या सदस्यांची परिचय सुद्धा सभेमध्ये घेण्यात आला नाही. अचानक सभा सुरू झाल्यानंतर अर्ध्या विषयांचे वाचण्यास करण्यात आले नाही, असा आरोप नगरसेवक देशमुख यांनी केला. जेसीबी वारंवार खराब होत असल्याने नगरसेवकांना त्रास होत आहे. सुमार दर्जाच्या जेसीबीची खरेदी केली. त्यामुळे ही वेळ आल्याचा आरोप विरोध पक्षांच्या सदस्यांनी यावेळी केला. मागील दोन वर्षांपूर्वी उज्ज्वल कंन्स्ट्रक्नशचे काम रद्द केल्यानंतर पाणीपुरवठाच्या कामात बाबत ई- निविदा काढण्याबाबत टाळाटाळ केली जात आहे. ऑफलाईन निविदा करून त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रकार मागील दोन वर्षापासून सुरू आहे. विशिष्ट कंत्राटदारांना लाभ पोहोचवून त्यांच्यासोबत सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी भागीदारी करीत असल्याचा आरोप देशमुख आणि नागरकर यांनी केला.The first meeting of the new standing committee was controversial
0 comments:
Post a Comment