Ads

*प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न*


भद्रावती :
भद्रावती तालुका कृषी अधिकारी  यांनी आयोजित केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत दिनांक 08/10/2021 रोजी स्थळ पंचायत समिती सभागृह, भद्रावती येथे तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मा. श्री. आर. जे. मनोहरे साहेब, कृषी उपसंचालक, जि.अ.कृ.अ. कार्या. चंद्रपूर तथा प्रकल्प संचालक (आत्मा), चंद्रपूर यांनी दिली, सदर कार्यशाळेतील उपस्थित शेतकरी गट, महिला गट, शेतकरी मित्र, शेतमाल प्रक्रिया उद्योजक, शेतकरी व क्षेत्रीय कर्मचारी यांना थेट संवाद साधून, चर्चात्मक PMFME योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्ताविक श्री. पी. जी. कोमटी, तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांनी केले. श्री. जयंत पराते, SBI शाखा प्रबंधक, भद्रावती यांनी प्रक्रिया उद्योग करिता कर्ज प्रस्ताव व  योजने बाबत मार्गदर्शन केले तर श्री. वरभे, कृ. प. चंदनखेडा, श्री. कवाडे, कृ. प. चंदनखेडा, श्री. ठेंगणे, कृ. प. भद्रावती यांनी PMFME व प्रक्रिया उद्योग बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तर संचालन श्री. हिवसे, स. तं. व्य. भद्रावती यांनी केले, कार्यशाळेत श्री. झाडे, मं.कृ.अ. भद्रावती व क्षेत्रीय कर्मचारी, तालुका शेतकरी सल्लागार समिती सदस्य, शेतकरी मित्र, आत्मा गटातील अध्यक्ष व उमेद व मा.वि.म. गटातील महिला यांनी उपस्थिती दिली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment