Ads

चंद्रपूर जिल्हाला 200 युनिट विज मोफत द्या - आ. किशोर जोरगेवार .

चंद्रपुर :-
विज उत्पादक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाला घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी चंद्रपूरकरांची मागणी आहे. या मागणीचा मी सातत्याने पाठपूरावा करत आहे. मात्र या मागणीच्या पुर्ततेसाठी अपेक्षित असा प्रतिसाद संबंधीत विभागाकडून मिळत नसल्याने सदर मागणीसाठी भविष्यात चंद्रपूरात मोठे जनआंदोलन उभे राहू शकते त्यामूळे नागरिकांची असलेली ही मागणी मान्य करावी अशी मागणी मंचावरुन बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. याच कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीही चंद्रपूर जिल्हाला किमान 100 युनिट मोफत देण्यात येईल अशी अपेक्षा उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडून व्यक्त केली.
राजूरा, मुल, सावली, चंद्रपूर, आणि चिमूर तालुक्यातीली 33/11 केव्ही उपकेंद्राचे अभासी पध्दतीद्वारे उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनूले, जिल्हा परिषदेच्या मूख्य कार्यकारी अभियंता मिताली सेठी, अप्पर जिल्हाधिकारी विद्यूत वरखेडकर, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल देशपांडे, महावितरनचे अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे आदींची मंचावर उपस्थिती होती.
या कार्यक्रमात पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा वनआच्छादन व वनांच संरक्षण करणारा जिल्हा असतांनाही केवळ येथील औष्णीक विज केंद्रामूळे येथे प्रदुषण सर्वाधिक आहे. याचा मोठा दुष्परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामूळे याचा मोबदला म्हणून येथील नागरिकांना 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी रास्त मागणी चंद्रपूरकरांची आहे. या मागणीचा अभ्यास केल्यास केवळ 54 मेगाव्हॅट विज चंद्रपूरकरांना मोफत दयावी लागणार आहे. त्यामूळे जवळपास साडेपाच हजार मेगाव्हॅट विज तयार करणा-या जिल्हाला 54 मेगाव्हॅट विज निशुल्क देणे सहज शक्य आहे जी उत्पादनाच्या केवळ १% आहे. त्यामूळे ही मागणी सहज पूर्ण करता येणारी असल्याचे ते यावेळी म्हणाले, तसेच सदर मागणी मान्य न झाल्यास विद्युत निर्मिती करुनही मुंबई, पुणे या जिल्हांच्या दरातच आम्हाला विज विकत घ्यावी लागत असल्याची भावणा येथील नागरिकांमध्ये निर्माण होऊ शकते यातून भविष्यात मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या समक्ष बोलत 200 युनिट मोफत देण्याची मागणी यावेळी ठामपणे मांडली.
तसेच यावेळी आ. जोरगेवार यांनी शहरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर होत आहे. अशात रस्त्याकडेला उभे असलेल्या विद्युत खाबांमुळेही वाहतुक प्रभावित होत आहे. ही बाब लक्षात घेता शहरात भुमिगत विद्यूत जोडणी करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली आहे. सोबतच नविन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तयार होत असलेल्या पागल बाबा नगर येथ आणि वडगाव येथे नवीन उपकेंद्र तयार करण्याची मागणीही यावेळी बोलतांना त्यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांना केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment