Ads

ठाकरे सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व अतिरिक्त सेस कमी करून जनतेला दिलासा द्यावा भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांची मागणी.

BJP's Chandrapur district general secretary Subhash Kasangottuwar's demand that the Thackeray government should provide relief to the people by reducing the additional cess on petrol and diesel.
चंद्रपुर :-देशात जिथे जिथे भाजप शासित राज्ये आहेत त्या त्या राज्यात पेट्रोलचे दर मोठ्या फरकाने कमी होत आहेत सहाजिकच अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यानेही मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल वरील व्हॅट व अतिरिक्त सेसचे दर कमी करून जनतेला दिलासा द्यावा. महाराष्ट्रात कर कपात होऊन पेट्रोल-डिझेलची स्वस्त करण्याची गरज आहे अशी मागणी भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्व संध्येला पेट्रोल वरील एक्साईज कर पाच रुपये प्रतिलिटर तर डिझेलवरील एक्साईज कर दहा रुपये प्रति लिटर कमी करून जनतेला मोठा दिलासा दिला. केंद्र सरकारने कर कपात केल्यामुळे एकूण करांचा परिणाम ध्यानात घेता महाराष्ट्रात प्रत्यक्षात पेट्रोल सहा रुपये व डिझेल बारा रुपये स्वस्त झाले आहे. मोदी सरकारने ज्याप्रकारे पेट्रोल डिझेल वरील करात कपात करून जनतेला दिलासा दिला त्याच प्रकारे राज्यातील महा विकास आघाडी सरकारने ही करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे अशी भारतीय जनता पार्टी ची मागणी आहे भाजपाचे चंद्रपूर जिल्हा महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार यांनी सांगितले.
महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी सातत्याने पेट्रोल डिझेल दर वाढीच्या विरोधात आंदोलनाचा स्टंट केला होता आता मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा दिलासा दिल्यानंतर आघाडी सरकारनेही कर कपात करून आपल्या वतीने अधिक मदत केली पाहिजे ही जनतेची स्वाभाविक अपेक्षा आहे तथापि अजूनही आघाडी सरकारकडून कर कपात करण्यास टाळाटाळ होत असल्याने आघाडीतील घटक पक्षांची आंदोलने म्हणजे केवळ राजकीय मतलबीपणा होता हे स्पष्ट झाले आहे. भाजपा शासित राज्यांनी नागरीकांना करात कपात करून अधिकची सवलत दिली पण महाराष्ट्राने दिलेली नाही.
राज्यात डिझेलवर २४ टक्के व्हॅट आकारला जातो आणि पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आकारला जातो त्या खेरीज पेट्रोल वर प्रति लिटर नऊ रुपये सेस ही आहे यामध्ये दुष्काळासाठी लागू केलेल्या तीन रुपये प्रति लिटर सेसचा समावेश आहे राज्य सरकारला पेट्रोल डिझेल वर करापोटी ३० ते ४० रुपये प्रति लिटर मिळतात
आमची मागणी आहे की आपल्या सरकारने पेट्रोल व डिझेल वरील व्हॅट कमी करून मोदी सरकार प्रमाणेच पेट्रोल साठी पाच रुपये तर डिझेल साठी दहा रुपये सवलत द्यावी तसेच राज्यात दुष्काळी स्थिती नाही त्यामुळे पेट्रोल वरील प्रतिलिटर तीन रुपये दुष्काळी सेस ताबडतोब रद्द करावा ही कपात कमी केल्यामुळे मिळणाऱ्या सवलती शिवाय अतिरिक्त असावी अशी मागणी सुभाष कासनगोट्टूवार यांनी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment