चंद्रपूर : शहरातील अरविंद नगरातील नाजनीन हारून कोलसावाला यांच्या घरी चाकू आणि नकली पिस्तुलचा धाक दाखवून पाच अनोळखी व्यक्तींनी दरोडा टाकून पाऊणे दोन कोटींची रोकड घेऊन लंपास केली. तब्बल पंधरा तासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक करून बेड्या ठोकल्या आहेत. लंपास केलेले पाऊणे कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
17 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी सव्वाचारचे सुमारास फिर्यादी नाजनीन हारून कोलसावाला यांचे रामनगर पोलिस स्टेशन हद्दीतील अरविंद नगरातील त्यांचे घरी आई, सासु हे हजर असतांना पाच अनोळखी इसमांनी घरात प्रवेश केला. गळयाला चाकु लावुन, . फिर्यादीचे सासुचे तोंड दाबुन व नकली पिस्तोलचा धाक दाखवुन फिर्यादीच्या भावाच्या बेड रूम मधील पलंगा बॉक्स मधील थैल्यात भरून ठेवलेले १ करोड ७३ लाख ५० हजार रूपयाची रोकड चार थैल्या भरून पांढ-या रंगाच्या गाडीने पळून गेले.
रामनगर पोलिस पोलिस ठाण्यात या दरोड्याची तक्रार दाखल केली. अपराध कमांक ११६४/२०२१ कलम ३९५ भादंवि प्रमाणे अनोळखी आरोपींवर गुन्हा नोंद करून तपासाची चक्रे फिरविली. पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक • हर्षल आकरे व सहका-यासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळाच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे व गोपनिय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी सपोनि हर्षल आकरे हे डी.बी. पथकासह नागपुर येथे रवाना झाले. तसेच पोउपनि विनोद भुरले हे डी. बी. पथकासह बल्लारशाह, राजुरा येथे रवाना झाले. गुन्हयात वापरलेले वाहन जप्त करून अज्ञात आरोपीतांचा सायबर सेलच्या मदतीने शोध घेवुन डी. बी. पथकानी दोन आरोपींना नागपुर येथुन ताब्यात घेतले तसेच पळुन जाणेकरीता गुन्ह्यात वापरलेले वाहन हुन्डाई आय २० गाडी कमांक एम. एच २७ बिई ०७५१ गाडी जप्त करण्यात आली. त्यांचेकडुन दरोडा घालुन चोरून नेलेले २००० रू व ५०० रू च्या नोटा एकुण रोख रक्कम १ करोड ७३ लाख रूपये व गुन्हयात वापरलेली महिंद्रा मरांजो कंपनीची चार चाकी वाहन कमांक एम. एच. ३४ व्हि. ५९९९ ची गाडी नकली पिस्तोल व चाकु जप्त करण्यात आले. तब्बल पंधरा तासात दरोड्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळविले आहे.
पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस निरीक्षक मधुकर गिते, सपोनि हर्षल अकरे, पोउपनि विनोद भुरले, पो.हवा. रजनीकांत पुठ्ठावार प्रशांत शेंदरे, नापोशि पुरुषोत्तम चिकाटे, विनोद यादव, पेतरस सिडाम, किशारे वैरागडे, आनंद खरात, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, पोशि लालु यादव, विकास जुमनाके, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना तसेच सायबर पोलीसांनी दरोड्यातील आरोपींना अटक करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे.
0 comments:
Post a Comment