चंद्रपुर :-जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या भवितव्यावर गदा आणणारे तीन काळे कायदे अखेर रद्द झाले.
शेतकऱ्यांच्या अखंड एकजुटीच दर्शन घडविणाऱ्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलन राजधानीच्या सीमेवर गेले अनेक महिने सुरू आहे.त्या आंदोलनात कित्येक निरपराध शेतकरी बांधवांना आपला जीव गमवावा लागला,काहींना तर गाडीखाली चिरडण्याचं निष्कृत्य या सरकारने करण्याचं काम केलं.
परंतु, हा अत्याचार सहन करून देखील आपले शेतकरी बांधव खचले नाहीत,ते अडून राहिले,अढळ राहिले.संघर्ष सुरू ठेवला आणि आज त्या संघर्षाच्या पुढे सरकारला झुकावं लागलं आहे.
आज कायदे मागे घेतले गेले आहेत हा देशातील शेतकऱ्यांचा विजय आहे.
शेतकरी बांधवांच्या एकजुटीचा विजय असो..!
0 comments:
Post a Comment