वरोरा : शहरातील यात्रा वार्डमधील बुद्धभूमिच्या खुल्या मैदानाला संरक्षण भिंत बांधण्याच्या कामाचे आज शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६:३० वाजता खासदार बाळुभाऊ धानोरकर व नगराध्यक्ष यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
सुमारे तीन एकर परिसरात वसलेल्या बुद्धभूमी मैदानाला संरक्षण भिंत नसल्याने विविध सामाजिक कार्यक्रम घेताना आयोजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सदर बुद्धभूमी मैदानाला संरक्षण भिंत बांधण्यात यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत होती. या मागणीचा विचार करून नगर परिषदेने अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत बुद्धभूमी मैदानाला संरक्षण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले.
या कामावर पहिल्या टप्प्यात ५० लक्ष रुपयांपेक्षा अधिक निधी खर्च होणार असून दुसऱ्या टप्प्यात आणखी तेवढ्याच निधीची तरतूद करण्यात येणार आहे. यानिमित्ताने शुक्रवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या शुभहस्ते बुद्धभूमी संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी भंते धम्म सारथी, नगराध्यक्ष अहेतेश्याम अली, उपाध्यक्ष अनिल झोटिंग, नगरसेवक पंकज नाशिककर,नगरसेविका राखी काळबांडे, नगरसेवक डॉ गुणाणंद दुर्गे, नगरसेविका चंद्रकला चीमुरकर, सुनील वरखडे, मोनू चीमुरकर, जयंत ठमके, प्रवीण चिमुरकर, बांधकाम अभियंता सुरज पूणवटकर यांच्यासह बहुउद्देशीय पंचशील मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment