Ads

वृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

Warning of self-immolation of an old farmer
भद्रावती,दि.१९(तालुका प्रतिनिधी):-

वारंवार प्रशासनाकडे दाद मागुनही न्याय न मिळाल्यामुळे त्रस्त झालेल्या ८२ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने अखेर प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा पत्रपरिषदेतून दिला आहे.
महादेव गणपती वरारकर रा.घोनाड त.भद्रावती असे आत्मदहनाचा इशारा देणा-या वृद्ध शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मौजा घोनाड येथे भूमाक्र.१३१ मध्ये आमची ७.९० हे.आर. शेतजमीन आहे. ही शेतजमीन माझ्या पुतण्याने मला अंधारात ठेवून सुखदेव डाकोजी खोब्रागडे रा.बेलेवाडी तुकूम चंद्रपूर यांना विकली. याबाबतचा वाद न्यायालयात गेला आहे. न्यायालय जो निर्णय देईल, तो मला मान्य राहील. परंतू तोपर्यंत मला माझ्या हिश्याची शेतजमीन वाहू द्यावी अशी मागणी त्यांनी पत्रपरिषदेत केली. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करून दाद मागितली असता आपल्याला न्याय मिळाला नाही. माझे वडील स्वातंत्र्य संग्राम सैनिक होते. मी संपूर्ण आयुष्यात कधीही भ्रष्टाचार केला नाही. उलट चांगल्या कामासाठी लोकांना मदतच केली. मग माझ्यावर असा प्रसंग का ? असा प्रश्न उपस्थित करत १० दिवसांच्या आत मला न्याय न मिळाल्यास मी भद्रावतीच्या तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करीन असा इशाराही महादेव वरारकर यांनी पत्रपरिषदेत दिला. तसेच तहसीलदारांनी आपल्याला शेती ला कुंपण करायला सांगितले.त्याकरीता आपण ७ हजारांचे साहित्य घेतले. ते संपूर्ण गायब झाले आहे. याबाबत पोलिसांना सांगितले असता पोलिसांनी आपणास हाकलून लावले.असा आरोपही वरारकर यांनी पत्रपरिषदेत केला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment