Ads

भद्रावती नगर परिषदेला केंद्र सरकारचा'स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१'पुरस्कार प्रदान .

Bhadravati Municipal Council awarded 'Clean Survey 2021' by Central Government
भद्रावती,दि.२०(तालुका प्रतिनिधी):-
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचा'स्वच्छ सर्व्हेक्षण २०२१' पुरस्कार दि. 20 नोव्हेंबर रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे स्वच्छ अमृत महोत्सव -2021या कार्यक्रमा अंतर्गत भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांना मान्यवरांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी देशातील विविध शहरांना स्वच्छ सर्वेक्षण-2021 ,सफाई मित्रसुरक्षा पुरस्कार,कचरा मुक्त शहर मानांकन असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले.सदर पुरस्कारांमध्ये भद्रावती शहरात "चांगल्या सवयी व नावीन्यपूर्ण उपक्रम" राबविण्यात आल्याबद्दल पश्चिम विभागात 50 हजार ते 1 लक्ष लोकसंख्या गटात ''सर्वोत्कृष्ट शहर'' चा पुरस्कार मिळाला. सदर पुरस्कार गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय भारत सरकार यांचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा व संयुक्त सचिव ,अभियान संचालक स्वच्छ भारत मिशन (नागरी )श्रीमती रूपा मिश्रा यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्कार स्वीकारण्या करिता भद्रावती शहराचे नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर ,मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, माजी न.प.उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेवक सुधीर सातपुते उपस्थित होते.
यावेळी स्वच्छ सर्वेक्षण 2021 चे पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री हरदीप सिंग पुरी,गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय ,भारत सरकार यांचे हस्ते जाहीर करण्यात आले. यामध्ये भद्रावती शहराचा पश्चिम विभागात 50 हजार ते 1लक्ष लोकसंख्या गटात 132 शहरांपैकी 8वा क्रमांक आला.तसेच कचरा मुक्त शहराचा 1 स्टार मानांकन सुद्धा प्राप्त झाला.भद्रावती न.प.मार्फत घनकचरा प्रकल्प येथे संकलित केल्या जाणाऱ्या टायर पासून विविध प्रकारच्या उपयोगी व शोभिवंत वस्तू तयार करण्यात येत असतात. त्यामुळे शहरातील टायर पासून होणारा घनकचरा कमी होण्यास मदत मिळाली. तसेच संकलित प्लास्टिक पासून बनविण्यात येणाऱ्या बसायचे बेंच (बाक), प्लास्टिक पिलर, नालीतील चेंबर ,कवल इ. उपायोगी ,टिकाऊ व शोभिवंत वस्तू बनविल्या जातात. त्यामुळे शहरातील प्लास्टिक कचरा कमी होण्यास मदत मिळाली. सदर "चांगल्या सवयी व नावीन्यपूर्ण उपक्रमाचा" भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प देउरवाड़ा रोड भद्रावती येथे प्लास्टिक पिलर चा उपयोग करून उद्यानाची सुरक्षा सीमा बनवण्यात आली.
सदर नावीन्यपूर्ण उपक्रम नियमित स्वरूपात सुरू ठेवून त्यापासून बनविण्यात येणाऱ्या वस्तू शहरातील विविध भागात उपयोगात आणण्यात येणार असल्याचे तसेच स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये दिलेल्या सहकार्य बद्दल शहरातील नागरिकांचे अभिनंदन नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांचे मार्फत करण्यात आले.तसेच स्वच्छ सर्वेक्षण-2022 ,कचरामुक्त शहर मानांकन मध्ये यापुढे असेच नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment