Ads

भद्रावतीत नविन उद्योग आनुन बेरोजगार युवकांना रोजगार उप्लब्ध करून द्या शरद पवारा कडे मागणी

Demand to Sharad Pawar by bringing new industries in Bhadravati and providing employment to unemployed youth
भद्रावती (तालुका प्रतिनिधी):-गेल्या 27 वर्षांपासून निप्पॉन dendro वीज प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेली शेतजमीन आजही खितपत पडलेली आहे. या जागेवर मोठा प्रकल्प व्हावा ,बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा ,यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत लवकरच चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भद्रावती येथील कार्यक्रमात दिली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल व सुबोध मोहिते उपस्थित होते.
भद्रावती तालुक्यातील निप्पॉन dendro वीज प्रकल्पासाठी सत्तावीस वर्षांपूर्वी 1183.23 हेक्टर इतकी लाख मोलाची शेत जमीन अधिग्रहित करण्यात आली होती. 29 सप्टेंबर 1994 रोजी प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्या हस्ते झाले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणून ना. शरद पवार उपस्थित होते. तसेच तत्कालीन ऊर्जामंत्री के .पी. एन .साळवे व इस्पात ग्रुपचे चेअरमन मित्तल हे सुद्धा उपस्थित होते.
ना. शरद पवार यांनी या जागेला भेट द्यावी, यासाठी खा. बाळू धानोरकर यांनी त्यांच्याशी यापूर्वीच चर्चा केली होती .तसेच नुकत्याच चंद्रपूर येथे झालेल्या संवाद उद्योजकांचा या कार्यक्रमात निप्पॉन च्या जागेविषयी चर्चासुद्धा करण्यात आली होती. 19 नोव्हेंबरला अतिशय व्यस्त अशा कार्यक्रमात पवार हे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भद्रावतीत थांबले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मुनाज शेख, सुधाकर रोहणकर विलास नेरकर यांनी निप्पॉन जागेबाबत त्यांना निवेदन दिले. ते त्यांनी स्वीकारले व याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. तालुक्यात बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नवीन उद्योग व त्यात स्थानिकांना संधी तसेच निप्पॉन याबाबत निवेदन देण्यात आले. आयुध निर्माणी कर्मचाऱ्यांनी खाजगीकरण बाबत असंघटीत कामगार सेल जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख यांच्या माध्यमातून देण्यात आले
कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहणकर, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर ,सुनील महाले फय्याज शेख ,रोहन कुटेमाटे, पनवेल शेंडे ,रवी नागपुरे ,सबीया देवगडे , कृष्णा तूरानकर ,संतोष वासमवार, सुरज लावाडिया ,बाबू सैयद, रोहित वाबीटकर, बंडू वनकर, सुशांत लांडगे, राजेंद्र ताजणे सर रोशन कोमरेड्डीवार ,इरफान कुरेशी,राकेश किणेकर, हे उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment