BJP's Demonstration in front of tehsil office against the alliance government
भद्रावती(तालुका प्रतिनिधी): भद्रावती तालुका व शहर भाजपाच्या वतीने आज दि.२ नोव्हेंबर रोजी येथील तहसील कार्यालयासमोर आघाडी सरकारच्या विरोधात धरणे व निषेध आंदोलन करण्यात आले.
मुक्या आंधळ्या बहऱ्या सरकारला जागविण्यासाठी, एक दिवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, नुकसान भरपाई अभावी शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, महाराष्ट्रद्रोही महा विकास आघाडी सरकारने मायबाप शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप न दिल्याने राज्यातील शेतकऱ्यांवर यंदाची दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. या मुक्या आंधळ्या बहिऱ्या तिघाडी सरकारच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी भद्रावती तालुका व शहरच्या वतीने भद्रावती तहसील कार्यालय समोर धरणे व निदर्शने आंदोलन करुन तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रवीण ठेंगणे, पं.स. सभापती, किशोर गोवरदीपे, नरेंद्र जीवतोडे, यशवंत वाघ,जि.प. सदस्य, अफझलभाई, संजय वासेकर, रवींद्र सहारे, संजय ढाकणे, माधव बांगडे, निशांत देवगडे, हँडसम राव, गोविंदा बिंजवे, गजानन कामतवार व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment