Ads

तालुक्यात "मक्तेदारी" च्या पत्रकारितेतून वृत्तपत्र लागले "फाटायला".....!

ब्रम्हपुरी :- (सुभाष माहोरे )

लोकशाहीत पत्रकारितेला जी जबाबदारी दिली आहे ती एका परीने विरोधी पक्षाची आहे. खरं तर लोकशाहीला तीनच स्तंभ पण पत्रकारितेला समाजात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाते. समाज हितासाठी निडर, निर्भय पणे उभे असलेले प्रामाणिक पत्रकार आज समाजहितासाठी अविरत झटत असल्याचे बघायला मिळतात आणी वेळोवेळी त्यांच्या चांगल्या कार्याची समाजाकडून दखल घेण्यात येऊन प्रशंसा देखील होते. मिळालेला मान-सन्मान व प्रशंसा हिच आपल्या जीवनाची जमा-पुंजी या मनोभावनेने ती व्यक्ती निष्कलंक पणे जीवन व्यतित करीत असते मात्र कधी-कधी अभिजात पत्रकारिता म्हटलं जाते ती पाळली जात नाही.?

एखादं पत्रकार जेव्हा समाज हित बाजूला सारून फक्त स्व:हित जोपसतो व कलंकित पत्रकारिता करत असतो तेव्हा पत्रकारिते सारख्या पवित्र क्षेत्राला व त्याच्या वर्तमानपत्राला नक्कीच ग्रहण लागतोय हे मात्र नक्की.

ब्रम्हपुरी तालुक्यात मक्तेदारी च्या पत्रकारितेने, तालुक्यातील पत्रकारिता गटा- गटात विभागली जाऊन विषय कोर्टाच्या पायरीवर गेल्याचे सद्यस्थितीत पाहायला मिळत आहेत.

कुठलाही व्यावसायिक माध्यम न जोपसता फक्त पत्रकारितेच्या माध्यमातून खंडणी वसुलत आलिशान रित्या उपजीविका चालवणारे महाभाग आज घडीला "अनुभवाच्या मक्तेदारी" चा अविर्भाव आणत, नव-नवीन पत्रकारांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करून आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न तालुक्यात करत असल्याचे निदर्शनास येत आहेत.

आज घडीला युवा वर्ग पत्रकारितेच्या क्षेत्राकडे आकर्षित होऊन समाजातील चाली रीती व विविध समस्येच्या विरोधात समाजकार्याने पेटून उठावा ही सद्यास्थितीत परिस्थिती उद्भवत असतांना हे सर्व ब्रम्हपुरी तालुक्यातील "प्रस्तापित पत्रकार" लोकांना पचणी पडत नसल्याचे तालुक्यात स्पष्ट होत आहे व त्याचे अनिष्ट परिणाम तालुक्यातील पत्रकारितेत समोर येत आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment