ख्रिस्ताणंद चौक झाले धोक्याचे.
ब्रम्हपुरी :- येथील ख्रिस्तानंद चौक हे ट्राफिकच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे चौक आहे कारण याच चौकमधून नागपूर गडचिरोली, वडसा व ब्राम्हपुरीच्या मुख्य बाजारपेठेत जावं लागते, तसेच या चौकमध्येच ख्रिस्तानंद हास्पिटल चे मुख्य प्रवेश दार असून अनेक मोठे हास्पिटल याच भागात आहेत त्यामुळे हे चौक सतत गजबजले असते त्यामुळं इथे सतत दोन ट्राफिक पोलीस पहायला मिळतात, मात्र या ट्राफिक पोलिसांचे कधी इथे होणाऱ्या ट्राफिकच्या कोंडीवर नियंत्रण असल्याचे लक्षात येत नाही. ख्रिस्तानंद हास्पिटल पुढील नागपूर रोडवर ऐन मुख्य चौकात सतत दोन तीन प्रायव्हेट ट्रॅव्हल्स उभ्या असतात त्यामुळे महामंडळ च्या बसेस थांबवायला काय तर लोकांना दुसऱ्या बाजूने जर एखादे वाहन येत असेल तर रोड क्रास करणे सुद्धा अवघड झाले आहे त्यामुळे या चौकात कर्तव्यावर दोन ट्राफिक पोलीस असून सुद्धा अधिकच ट्राफिकची समस्या निर्माण झाली आहे त्यातल्या त्यात परत दिवाळी सारख्या सनामुळे अधिकच ट्राफिक वाढून हे ठिकाण जनतेसाठी अत्यंत धोकादायक व डोकेदुखी झाले असून या चौकात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या कर्तव्यावर जनता शाशंक आहे.
0 comments:
Post a Comment