घुग्घुस :- दिवाळी हा देशातील सर्वात मोठा उत्सव मात्र कामबंद होऊन वेतन ही मिळत नसल्याने वेकोलीत कार्यरत कामगारांची दिवाळी ही काळीच जाणार होती.
मात्र काँग्रेस नेत्यांच्या हिसक्याने कामगारांना दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच वेतन मिळाले व कामगारांचे अश्रू हास्यात बदलले
वेकोलीच्या निलजई ।। ते नायगाव सी.हच.पी येथे लोकेश कंपनीच्या (LIPL) अटेंच मध्ये आंध्रप्रदेश येथील वेंकटराव यांच्याकडे कोळसा वाहतुकीचे काम करणारे कामगारांचे काम बंद झाल्याने कामगार हवालदिल झाले होते.
दिवाळी सारखा म्हत्वपूर्ण सण असून ही हातात पैसा नसल्याने चालकांची दिवाळी ही काळीच जाणार होती.
चालकांनी ही समस्यां कॉंग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांना सांगितले असता त्यांनी तातळीने कंपनी मालकाशी संपर्क साधून वेतन देण्यास सांगितले मात्र आपण दवाखान्यात असून आपण येऊ शकत नसल्याची भूमिका ट्रान्सपोर्टरने घेतली असता वेतन दिल्या शिवाय तुझ्या गाडया घुग्घुस बाहेर जातातच कसे असा कडक पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतला असता ट्रान्सपोर्टरने आपले सहयोगी ताहीर खान यांना पाठवले असता काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात बैठक होऊन तोडगा निघाला आपण हँड कॅश आणली नसून आपण गूगल पे करणार असल्याचे सांगितले मात्र दोन दिवस बँक बंद असल्याने दिवाळीच्या पूर्वसंध्येला पुनश्च कामगारांन मध्ये निराशा निर्माण झाली मात्र काँग्रेस नेते राजूरेड्डी यांनी नगद रकमेची व्यवस्था करून काँग्रेस कार्यालयातच कामगारांचे वेतन देण्यात आल्याने कामगारांन मध्ये आनंदाचे उत्साहाची लाट निर्माण झाली.
आणि कामगारांची अंधारातील दिवाळी प्रकाशमय झाली
याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, काँग्रेस पदाधिकारी नुरुल सिद्दीकी, विशाल मादर, बालकिशन कुळसंगे, रोहित डाकूर, रोशन दंतलावार, इर्शाद कुरेशी, व अन्य उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment