चंद्रपुर :- विविध निधी अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने विकास कामे केल्या जात आहे. दरम्याण चंद्रपूरातील विविध विकासकामांचे काल मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपूजन करण्यात आले. यावेळी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार ,यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडच्या उत्तर भारतीय समाजाच्या महिला प्रमूख रुपा परसराम, उमकांत धांडे, जगदीश जूनगडे, डॉ. प्रमोद कोयाड्रवार, डॉ. विनोद कायरकर, शैलेश मुंजे, अजय शेंडे, बजरंग बागला, नामदेव वांढरे, यंग चांदा बिग्रेडच्या एस. बी. सी विभागाचे शहर संघटक रुपेश मुलकावार, आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष नरेश आत्राम, सिध्दार्थ मेश्राम, नितेश गवळे, आदिंची उपस्थिती होती.
विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केल्या जात आहे. यात त्यांना यशही प्राप्त होत असून विधानसभा क्षेत्राच्या विकासकामांसाठी मोठा निधी त्यांनी उपलब्ध केला आहे. या निधीतून अभ्यासिकांसह पायाभुत सुविधांवर काम केल्या जात आहे. यातील अनेक कामे पूर्ण झाली असून काही कामे प्रस्तावीत आहे. दरम्याण इंदिरा नगर, अष्टभूजा वार्ड आणि गोपालनगर येथील विकास कामे करण्याची स्थानिक नागरिकांनी आमदार किशोर जोरगेवार यांना मागणी केली होती.
मागणीची तात्काळ दखल घेत सदर कामांसाठी आ. जोरगेवार यांनी खनिज व स्थानिक आमदार विकास निधीअंतर्गत निधी मंजूर केला आहे. काल मंगळवारी त्यांच्या हस्ते सदर विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचा सर्वसमावेशक विकास करण्याच्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरु आहे. यासाठी मोठा निधी उपलब्घ करण्यासाठी माझा सातत्याने पाठपूरावा सुरु आहे. कोरोनाचे संकट असतांनाही दोन वर्षाच्या कार्यकाळात आपण चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी अपेक्षित असा निधी उपलब्ध करु शकलो याचे समाधान असल्याचे यावेळी आ. जोरगेवार म्हणाले. शहरी भागासह ग्राणिम भागातही अनेक विकास कामे सुरु आहे. इंदिरा नगर, अष्टभूजा या भागात आजवर अपेक्षित अशी कामे झाली नाही. त्यामूळे या भागांच्या विकासाला मी प्राधान्य देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले या कार्यक्रमांना स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
About
The Chandrapur Times
यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।
0 comments:
Post a Comment