Ads

वेकोली पोवनी कोळसा खाणीतील कामगारांचे उपोषण सुरू.

राजुरा (चंद्रपूर) :
वेकोलिच्या पोवनी २ कोळसा खाणीत माती काढण्याचे काम करणाऱ्या सीएमपीएल कंपनीतील कंत्राटी कामगारांनी विविध मागण्यांना घेऊन बेमुदत उपोषण सुरू केले. पाच दिवस लोटूनही कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात आला नाही. त्यामुळे हे उपोषण सुरूच आहे. दरम्यान, काही उपोषणकर्त्याची प्रकृती बिघडली. त्याला राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.
पोवनी दोन कोळसा खाणीत माती व कोळसा काढण्याचे कंत्राट सीएमपीएल या खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीत परप्रांतीय कामगारांचा मोठ्या प्रमाणात भरणा आहे. नियमांना डावलून ही कंपनी कामगारांवर अन्याय करीत आहे. कामगारांना वेजबोर्डनुसार वेतन द्यावे, कामगारांच्या खात्यात कंपनीने वेतन करावे, वेतन स्लीप द्यावी, दिवाळी बोनस द्यावा यासह अन्य मागण्यांना घेऊन सीएमपीएल कंपनीत काम करणाऱ्या प्रफुल्ल गौरकर,अमित जगताप, शेखर पाचभाई, प्रवीण लोनगाडगे, किसन मडावी,अनिल शेंडे,विशाल इटकेलवार, श्रावण तेलकापल्लीवार, चिंटू जेऊरकर, सुदर्शन देवाळकर, शरद टोंगे, किरण राजनवार, विजय नेवलकर, गजानन हनुमंते, प्रकाश आत्राम, नितेश चतुलवार, गुरुदास मडचापे, प्रकाश कोडापे, सुनील लांडे, प्रमोद थिपे यांच्यासह अन्य कामगारांनी कंपनीसमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पाच दिवस लोटूनही कंपनीला जाग आली नाही. त्यामुळे हे आंदोलन सुरूच आहे. उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे.
एका कामगाराची तब्येत बिघडली असून, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जोपर्यंत कामगारांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे कंत्राटी कामगार अमित जगताप यांनी सांगितले..

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment