घुग्घुस:- घुग्घुस शहरामध्ये पुन्हा एकदा आज दिनांक ०२/११/२०२१ मंगळवार ला मिलिंद आमटे यांच्या दुचाकी ला आम आदमी पार्टीच्या उपोषणा समोरच छत्रपती शिवाजी चौक इथे एका ट्रकदुचाकी स्वार ने दुचाकी ला धडक दिली ट्रक क्रमांक MH 34 BG 3157 ज्यामध्ये दुचाकी स्वार चा जीव वाचला. मागील २ महिण्यान पासून अशेच अपघात वारंवार घुग्घुस शहरामध्ये घडत आहे परंतु प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. घुग्घुस शहरातून मोठ्या प्रमाणामध्ये अवैध जड वाहनांची वाहतूक सर्रास पने सुरूच आहे. सामान्य नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकून घुग्घुस मधून प्रवास करावा लागत आहे. या जड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरातील रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडलेले आहे शहरातील प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे वेगवेगळ्या जीवघेण्या आजारांशी घुग्घूस येथील नागरिकांना सामना करावा लागत आहे. घुग्घुस शहरातील नागरिक सुस्त बसलेली आहे काही सामाजिक संघटना या विषयावर लढा देत आहे. मागील ४ दिवसां पासून आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण सुरू आहे परंतु प्रशासन सुस्त बसलेली आहे.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment