चंद्रपूर :- दि.13 नोव्हेंबरला ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या चंद्रपूर दौऱ्यात महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग महेश मेंढे यांना कांग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बेदम मारहाण केली.
सदर प्रकरणाचा वाद वाढत असून मारहाण करणाऱ्या कांग्रेस पदाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे करण्यात आली.
महेश मेंढे यांनी याबाबत पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले, मला मारहाण करण्यामागे मुख्य सूत्रधार हे खुद्द पालकमंत्री वडेट्टीवार आहे असा आरोप त्यांनी लावला. सदर प्रकरणाबाबत भद्रावती तालुक्याचे कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष शंकर खैरे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत मारहाणीचा निषेध व्यक्त केला. कोणत्याही पक्षात जर अनुसूचित जातीच्या माणसाला याप्रकारे हीन पध्दतीने मारहाण करीत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, बॅनर वर फोटो नाही टाकला म्हणून मारहाण करणे योग्य नाही, पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार मेंढे यांचं चुकल असेल मात्र त्या चुकीसाठी त्यांना मारहाण करणे योग्य नाही.
कांग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत खैरे यांनी जर पक्षातील लोकांना अशी वागणूक मिळत असेल तर आम्ही पक्षाचा राजीनामा देत मेंढे यांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
या प्रकरणाबाबत आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांच्याजवळ तक्रार करून अश्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार आहोत. Congress Scheduled Castes Department takes to the streets
0 comments:
Post a Comment