चंद्रपुर :- माता भगीनींच्या आशीर्वाद शिवाय अभुतपूर्व मताधिक्याने मुंबईच्या सर्वोच्च सभागृहात जाणे शक्य नव्हते. आपला आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहिला आहे. याचा प्रत्यय आज भाऊबीज निमित्य आयोजीत कार्यक्रमात आपल्या लक्षणीय उपस्थितीतून पुन्हा एकदा अनूभवास आला आहे. आपल्या याच आशीर्वाद आणि विश्वासातून लढण्याची उर्जा मिळते असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
आज सोमवारी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने भाऊबिज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला कल्यानी जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, उसगावच्या सरपंच निलीमा ठाकरे, सायली येरणे, युवती प्रमूख भाग्येश्री हांडे, विमल कातकर, सविता दंडारे, दुर्गा वैरागडे, वैशाली रामटेके, वैशाली मेश्राम, रुपा परसराम, कल्पना शिंदे, आशा देशमूख, शांता धांडे, आशू फुलझेले यांच्यासह इतर पदाधिका-यांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, महिलांचा सन्मान करणे त्यांना स्वतंत्रता देणे आणि या शक्तीला सकारात्मक कामात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी भाऊ म्हणून आपल्या खांद्यावर आहे. या देशात मातीला काळी आई आणि देशाला माता, गाईला गो-माता संबोधले जाते. त्या भूमीत महिलावर होणारे अन्याय दुर्लक्षित करण्यासारखे नाहीत. महिला अत्याचार थांबले पाहिजे, त्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे यासाठी यंग चांदा ब्रिगेडची महिला आघाडी काम करत असून ही संघटना माता, भगिनींच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. महिलांना सक्षम करण्याच्या दिशेने यंग चांदा ब्रिगेड काम करत असून त्यांच्या न्यायक हक्कासाठी संघर्ष करत आहे. सोबतच महिलांचे आरोग्य सुढृळ राहावे या करिता यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने महिलांसाठी मोठे आरोग्य शिबीरही आयोजीत केल्या जात आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र व्यायमशाळा तयार करण्याच्या दिशेनेही माझे प्रयत्न सुरु आहे. पात्र महिलांना निराधार, श्रावणबाळ यासह इतर शासकीय योजनांचा लाभ घेता यावा या करिता यंग चांदा ब्रिगेड काम करत आहे. शिक्षण क्षेत्रात संघटना यशस्वी काम करत आहे. कोरोना काळात संघटनेच्या महिलांनी केलेेले काम कौतूकास्पद होते. या महिला संघटनामूळे आम्ही अनेकांचे प्राण वाचवू शकलो तर गरजुंना शक्य ती मदतही पोहचवू शकलो याचे मला समाधान असल्याचे ते यावेळी म्हणाले, यंग चांदा ब्रिगेडच्या याच कार्यामुळे संघटनेत महिला मोठ्या प्रमाणात जूळत आहे. महिला आघाडी या संघटनेची एक प्रमूख ताकत आहे. शहरासह ग्रामीण भागातील प्रत्येक वार्डात यंग चांदा ब्रिगेडची महिलांच्या सक्रिय शाखा असून कार्यरत असून या शाखेच्या माध्यमातून माता, बहिनींचे दु:ख, व्यथा, वेदना माझ्या पर्यंत पोहचविल्या जात आहे. शेवटच्या गरजू पर्यंत पोहचण्याचा आमचा प्रयत्न असून यासाठी या शाखांचा आणखी विस्तार करण्याची गरजही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलून दाखविली.
रक्षाबंधन नंतर भाऊबीज हा भाऊ बहिणीच्या खोल प्रेमासाठी समर्पित केलेला दुसरा उत्सव असून बहीण-भावाच्या अतूट प्रेमाच्या नात्याला जोपासण्याचा सन आहे. आपणही आजी, आई, बहिण, पत्नी, मुलगी हि नाती टिकवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू असे ही ते यावेळी म्हणाले, या कार्यक्रमात यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांनी भाऊ म्हणून आमदार किशोर जोरगेवार यांना ओवाळनी करत औक्षवंत केले. आ. जोरगेवार यांनीही आपल्या बहिनींना भेट वस्तू देत भाऊबीजच्या शुभेच्छा दिल्यात या कार्यक्रामात यंग चांदा ब्रिगेडच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 comments:
Post a Comment