(घुग्घुस प्रतिनिधी):-नगरपरिषद येथे विशेष संक्षिप्त पूनपरीक्षण 2022 अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रम बालाजी लॉन येथे घेण्यात आला.यावेळी मंचावर उपस्थित मुख्याधिकारी आर्शीया जुही, जि. प. कन्या शाळेच्या मुख्याध्यपिका मंदा मोरे, शिक्षिका दिवसे, मंडल अधिकारी किशोर नवले,पुण्यनगरीचे प्रतिनिधी सुरेश खडसे,व तरुण भारतचे प्रतिनिधी संजय पडवेकर यांचे नगर परिषदचे कर्मचारी यांनी पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मतदार जागृती बाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषद तर्फे मतदार जनजागृती मार्गदर्शन व माहिती मतदारापर्यत पोहचवीण्याकरिता नगरपरिषद तर्फे विद्यालय व महाविधालय येथील वर्ग आठ ते पदवीपूर्व विदयार्थ्यांची पोस्टर प्रतियोगिता घेण्यात आली.याकरीता इंदिरा गांधी महाविद्यालय,प्रियदर्शनी कन्या विद्यालय, ग्रेस इम्यानुल इंग्लिश स्कुल, व शिक्षण महर्षी स्व.श्रीहरी जिवतोडे प्रथमेश कॉन्व्हेंट या शाळा व महाविद्यालयाच्या 47 विदयार्थ्यांनी मतदार जनजागृती अंतर्गत पोस्टर प्रतियोगितामध्ये भाग घेतला होता.या प्रतियोगिता पोस्टरमध्ये लोकशाहीचा जागर आणि संविधानाचा आदर तुम्हाला करावाचं लागेल, चला जागे व्हा लोकशाही बळकट करण्यासाठी स्वाभिमानाने मतदान करा, मतदार राजा जागे व्हा लोकचा धागा हो, मजबूत लोकतंत्र सशक्त भारत अशा प्रकारे पोस्टर मधून विदयार्थ्यांनी जन जागृती केली होती.या पोस्टर स्पर्धाची निवड जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यपिका मंदा मोरे,व शिक्षिका प्रतिभा येरमे यांनी केली यावेळी त्यांच्या सोबत जि. प. मुलांची शाळेच्या मुख्याध्यपिका दिवसे,व माउंट कॉन्व्हेंट चे शिक्षक संजय उपाध्ये होते.
प्रतियोगिता पोस्टर गट एक मधून प्रथम क्रमांक सानिया पठाण, दुसरा नाजिया शेख तर गट दोन मधून प्रथम दिव्या चंदू हिरेवार व दुसरा अनुष्का राजु बोढे यांनी पटकवीला यांना सन्माचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मुख्याधिकारी आर्शीया जुही यांच्या हस्ते गौरविण्यात आले तर ईतर विध्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगरपरिषद कर्मचारी, विदयार्थी व पालक गण उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment