भद्रावती (तालुका प्रतिनिधी) The chandrapur Time's News :- 2 महिन्यांपूर्वी भद्रावती येथे तहसीलदार म्हणून रुजू झाले डॉ. निलेश खटके यांना नागपूर लाचलुचपत विभागाने 25 हजार रुपये घेताना रंगेहात अटक केली आहे.
विटा भट्टी साठी लागणाऱ्या लाल माती उत्खननाची परवानगी देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी फिर्यादीला तब्बल 25 हजार रुपये मागितले मात्र लाच द्यायची इच्छा नसल्याने याबाबत फिर्यादीने लाचलुचपत विभागाला सम्पर्क साधत तक्रार केली. तक्रारीची पडताळणी केल्यावर तहसील कार्यालय भद्रावती येथे 25 हजार रुपये स्वीकारताना तहसीलदार खटके यांना रंगेहात अटक करण्यात आली. 2 महिन्यांपूर्वी पोंभुर्णा तालुक्यात तहसीलदार म्हणून कार्यरत खटके यांची बदली भद्रावती येथे झाली होती, मात्र महिन्याभराच्या कालावधीत त्यांना लाच प्रकरणी अटक झाल्याने महसूल विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. पुढील कारवाई नागपूर लाचलुचपत विभागाचे अधिकारी करीत आहेत..
0 comments:
Post a Comment