Ads

विकासकामांचा झंझावात वरोरा - भद्रावती विधानसभेत सुरूच ठेवणार

Warora in the whirlwind of development work - Bhadravati will continue
चंद्रपूर : अनेक आपत्तीचा सामना करत महाविकास आघाडी सरकार आपल्यास्तरावर विविध विकासाची कामे करीत आहेत. कोरोनासारखे संकट किंवा नैसर्गिक आपत्तीचा काळातही विकासकामे सुरु ठेवण्यासाठी शासनाच्या माध्यमातून माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. अशा परिस्थितीत न थांबता विकासकामांचा झंझावात वरोरा - भद्रावती विधानसभेत सुरूच ठेवणार असल्याचे प्रतिपादन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले.

त्या खासदार बाळूभाऊ धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळा दिनांक 6,7,9 व 10 डिसेंबरला वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात पार पडला त्यावेळी बोलत होत्या.
खनिज विकास निधी, 2515 ग्रामीण विकास निधी, खासदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ही विकास कामे करण्यात आली. या चार दिवसांमध्ये एकूण विविध योजनेअंतर्गत 1860 लक्ष रुपयाच्या भूमिपूजन व लोकार्पण वरोरा- भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपअभियंता बावनकुळे, कनिष्ठ अभियंता कटाईत, कनिष्ठ अभियंता सारिका, सभापती रविंद्र धोपटे, वरोरा काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद भोयर, संजीवनी भोयर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजू चिकटे, देवानंद मोरे, यशोदा खामनकार, दीपाली माटे, प्रमोद मगरे, बाळू चिंचोळकर, संजय घागी, विशाल बदखल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, गावातील सरपंच, सदस्य, सचिव ,काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व गावकरी मंडळी आदी उपस्थित होते.
वरोरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील सिमेंट रोडचे पक्के बांधकाम, पांदन रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण, नविन समशान भूमी तयार करणे, शाळेच्या प्रांगणात वॉल कंपाऊंड बांधणे असे विविध विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा वरोरा तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रात करण्यात आले.

वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पांदण रस्ते तयार झाल्याने शेतकऱ्यांसाठी वर्षातील दोन्हीही पिके घेण्यासाठी पांदणरस्ते सोईचे ठरणार आहे. लोकसभा आणि विधानसभा क्षेत्रातील विकास कामे जास्तीत जास्त कसे करता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment