Ads

बाळापुर (बुज.) येथे विविध विकासकामांचे आम.बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते लोकार्पण


नागभीड :- पारडी - मिंडाळा - बाळापुर क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य व भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपुरे यांच्या पाठपुराव्याने बाळापुर ( बुज.) येथे मंजुर झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण चिमुर - नागभीड विधानसभेचे आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले . यावेळी जि.प.सदस्य संजय गजपुरे व पं.स.सदस्य संतोष रडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा निधीतुन करण्यात आलेल्या बाळापुर (बुज.) येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे विस्तारीकरण व संरक्षण भिंत , प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानाचे नुतनीकरण व परिसरातील जागेत पेव्हर ब्लॉक बांधकाम यासोबतच जि.प.समाजकल्याण निधीतून प्रा.रमेश रामटेके यांच्या घराजवळील बौध्दविहार परीसर सौंदर्यीकरणाचे लोकार्पण याप्रसंगी करण्यात आले . संजय गजपुरे यांनी जिल्हा परिषद क्षेत्रातील प्रत्येक गावात विविध निधींच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे आपल्या कार्यकाळात पुर्णत्वास नेली असुन यासाठी त्यांनी माजी पालकमंत्री आम.सुधीरभाऊ मुनगंटीवार , खासदार अशोकभाऊ नेते , आमदार बंटीभाऊ भांगडिया , विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. रामदासजी आंबटकर , जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले , जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व आजी व माजी सभापती यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे.
याप्रसंगी बाळापुर चे वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवरकर , कृ.उ.बा. समिती सभापती आवेश पठाण, नागभीड न.प.उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती न.प. नागभीड सचिन आकुलवार, माजी जि.प.सभापती ईश्वर मेश्राम, ग्रा.पं. बाळापूर (बूज) चे सरपंच प्रशांत कामडी, उपसरपंच सौ. पुष्पमाला जनबंधु , जि.प. सर्कल प्रमुख धनराज बावनकर,कृऊबास संचालक धनराज ढोक व विलास मोहुर्ले , राजुभाऊ गुरपुडे, नितेश कुर्झेकर , बुथ प्रमुख मनोहर चेल्लीरवार , बाळापुर (बुज.) ग्रा.पं.चे सदस्य सौ.करिष्मा बावणे , सौ.आम्रपाली कसारे , सौ.शिल्पा ऊईके , शैलेश मोहुर्ले , विनोद जनबंधु व इतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment