Ads

ट्रक ट्रॅक्टरच्या धडकेत दोन जागीच ठार

Two killed in truck-tractor collision
घुग्घूस प्रतिनिधी :
वेकोलि वणी परिसरातील घुग्घुस खदान संकुलात बांधण्यात आलेल्या नवीन बायपास रोडवर ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी असून जखमीला उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
चस
एमएच 345080 या ट्रॅक्टरला 18 चाकी ट्रक क्रमांक एमएच 34 एबी 9362 ने जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रॅक्टर चालक मनोज, हेल्पर रुपेश बारसागडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक गंभीर जखमी आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूरला हलविण्यात आले आहे. घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले. पुढील तपास घूग्घूस पोलीस करीत आहेत.
घटनास्थळी काँग्रेस नेते राजूरेड्डी, रोशन पचारे, पवन आगदारी, सैय्यद अनवर व भाजप नेते विवेक बोढे घटनास्थळी दाखल झाले. मृतकास पन्नास लाख दिल्या शिवाय शव उचलू देणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणाव निर्माण झाले आहे. घटनास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment