वरोरा प्रतिनिधी :- न. प वरोऱ्याचे स्थापत्य अभियंता यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करा अन्यथा बेमुद काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा विविध कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे,
वरोरा नगर परिषद चे स्थापत्य अभियंता सुरज पुनवटकर हे दि.४/१२/२०२१रोजी रोडच्या कामाची पाहणी करीत असतांना मनसे चे तालुकाध्यक्ष वैभव डहाणे व राहुल खारकर हे तेथे आले व त्यांनी
रोडच्या कामाबाबत वाद घातला व शिविगाळी करून पुनवटकर यांच्या अंगावर सिमेंट फेकले,शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली,परंतु आज२०दिवस लोटूनही सदर आरोपींना अटक केली नाही,,यापूर्वी ही दि,६/१२/२०२१रोजी कार्यालय नगर परिषद वरोरा यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले होते, व दि,१५/१२/२०२१रोजी भारतीय नगर परिषद कामगार संघ जिल्हा चंद्रपूर शाखा वरोरा यांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी,, उपविभाग वरोरा यांना सुध्दा आरोपीच्या अटकेबाबत निवेदन दिले होते,, परंतु आजपर्यंत पोलिसांनी कुठलीच कारवाई केली नाही, तपास सुरू असल्याचा व आरोपीचा शोध घेत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे,परंतु ठोस भूमिका पोलीस घेत नसल्याचा आरोप काही आंदोलन कर्त्यांनी केला आहे,,३दिवसात आरोपींना अटक न झाल्यास बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना शाखा वरोरा च्या वतीने देण्यात आला आहे,
0 comments:
Post a Comment