Ads

सिमेंट उद्योगांवर लक्ष ठेवण्यारी शासकीय प्रणाली कार्यान्वित आहे का ? - आ. किशोर जोरगेवार अधिवेशनात उपस्थित केला प्रश्न .

चंद्रपुर :- चंद्रपूर जिल्हात मोठ्या प्रमाणात सिमेंट उद्योग आहे. चंद्रपूर जिल्हात प्रदूषण वाढविणाऱ्या उद्योगांच्या माध्यमातून जिल्हाचा अपेक्षित असा विकास झालेला नसून या उद्योगांमध्ये मनमानी कारभार सुरु आहे. त्यामूळे सदर उद्योगांवर व येथे काम करणाऱ्याकामगारांवर लक्ष ठेवणारी शासकीय प्रणाली कार्यान्वित आहे का? असा प्रश्न आज अधिवेशनात प्रश्न उत्तरांच्या तासावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित केला. यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर दिले मात्र हे शासकीय अधिकाऱ्यांसारखे उत्तर असल्याचे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हात सात सिमेंट कारखाने आहेत. या कारखाण्यांमार्फत मोठ्या प्रमाणात उत्खनन केल्या जात आहे. तसेच या उद्योगांमधून मोठ्या प्रमाणात प्रदूषणही होत आहे. या कारखाण्यांचा चंद्रपूरच्या विकासात अपेक्षित असा वाटा राहिलेला नाही. आज या सर्व बाबींवर आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. संबंधित विभागाचे अधिकारी सदर उद्योंमध्ये जावून तपासणी करतात का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला तसेच चंद्रपूरात मोठ्या प्रमाणात सिमेंट उद्योग आहेत, मोठ्या प्रमाणात येथे उत्खनन सुरु आहे. मात्र येथे काम करत असलेले उद्योग आणि पर्यायाने या उद्योगात काम करणा-या कामगारांवर लक्ष ठेवणारी प्रणाली येथे आहे का किंवा ही व्यवस्था पूढे येथे करण्यात येणार आहे का असा प्रश्न यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थिती केला.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment