घुग्घुस :- घुग्घुस येथील मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात लाभार्थ्यांना मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करून तसेच बनवून देण्यात येत असल्याने नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
केंद्र शासनाच्या असंघटित व श्रमिक कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा यासाठी ई-श्रम कार्ड नोंदणी सुरु करण्यात आली आहे या योजने अंतर्गत कामगारास दोन लक्ष रुपयांचा अपघात विमा, पंजीकृत कामगाराचा अपघात झाल्यास त्यात कामगार मरण पावल्यास किंवा पूर्णतः अपंग झाल्यास दोन लक्ष रुपयांची मदत आणि आंशिक अपंगत्व आल्यास एक लक्ष रुपयांच्या मदतीसाठी पात्र ठरतो .
मागील काही दिवसापासून मा. आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी सुरु असल्याने दररोज शेकडो लाभार्थी केंद्रात येऊन आपली नोंदणी करीत आहे. या केंद्रातून 1,437 लाभार्थ्यांना मोफत ई-श्रम कार्ड नोंदणी करून व ई-श्रम कार्ड बनवून देण्यात आले.
ई-श्रम कार्ड नोंदणीचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
0 comments:
Post a Comment