(सुभाष माहोरे )ब्रम्हपुरी :-भारतीय राजकारणातील संवेदनशीलता व सुसंस्कृत पणा वाढविण्यात भारतरत्न अटलजी चे योगदान फार मोठे आहे असे प्रतिपादन भाजपा ओबीसी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा प्रकाश बगमारे यांनी ब्रम्हपुरी भाजपा कार्यालयात आयोजित स्व अटलबिहारी वाजपेयी यांचे जयंतीनिमित्त बोलतांना व्यक्त केले
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्ते प्रा संजय लांबे यांनी सुद्धा अटलजींच्या कार्याला उजाळा दिला.जेष्ठ कार्यकर्ते श्री नागोजी कार यांचे शुभहस्ते स्व अटलजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी भाजपा शहर महामंत्री तथा न प गटनेते मनोज वठे, महामंत्री माजी नगरसेवक मनोज भूपाल , कोषाध्यक्ष बाळू नंदूरकर,साकेत भाणारकर,भाजयुमो शहर महामंत्री स्वप्नील अलगदेवें,राहुल सुभेदार, सुशील थारकर,सुरेश बनपूरकर, व कार्यकर्ते उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन मनोज भूपाल यांनी तर उपस्थिताचे आभार मनोज वठे यांनी मानले
0 comments:
Post a Comment