Ads

ब्ल्यू झोन मध्ये बांधकामावर लादलेली बंदी मागे घेण्यात यावी

The ban on construction in the Blue Zone should be lifted

चंद्रपुर :-चंद्रपूर शहराला लागून असलेल्या मौजा गोविंदपुर,मौजा वडगाव व मौजा चांदा रयतवारी या भागातील अनेक भूखंड ब्ल्यू झोन मध्ये आलेले आहेत. जलसंपदा मंत्रालय अंतर्गत कार्यरत पाटबंधारे विभागाने निळ्या व लाल पुर रेषेची आखणी केली.मात्र शहरातील ज्या भागांमध्ये अनेक वर्षापासून कधीही पूर आलेला नाही, अशीही अनेक घरे किंवा भूखंड निळ्या व लाल रेषेच्या आत आलेले आहेत. तसेच इरई नदीपर्यंत आतापर्यंत महसूल विभागाने जमिनी अकृषक करण्याची मंजुरी दिली व नगरपालिका किंवा महानगरपालिकेने शेकडो भूखंडावर बांधकामाच्या परवानग्या सुद्धा दिलेल्या आहेत. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय लोकांनी वडगाव, नगीनाबाग परिसरात भूखंड घेऊन घर तयार करण्याची स्वप्ने बघितली. मात्र पाटबंधारे विभागाने दोन वर्षांपूर्वी आखलेल्या निळ्या व लाल पुर रेषे मुळे अशा हजारो भूखंड धारकांचे घर तयार करण्याचे स्वप्न अडचणीत आलेले आहे. आयुष्यात एकदाच भूखंड घेऊन घर बांधण्याची ऐपत असलेल्या मध्यमवर्गीयांची गुंतवणूक यामुळे अडचणीत आलेली आहे.पूररेषेतील भूखंड विकायला ग्राहक सुद्धा मिळत नाही. अशा अडचणीत सापडलेल्या मध्यमवर्गीय लोकांना दिलासा देण्यासाठी निळ्या पूररेषेच्या आतमध्ये बांधकामावर लादलेली बंदी तातडीने हटविण्यात यावी अशी मागणी वडगाव प्रभागाचे नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.आज 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 च्या दरम्यान जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी नगरसेवक देशमुख यांनी मनीषा बोबडे,अक्षय येरगुडे, आकाश लोडे, अमोल घोडमारे,गितेश शेंडे यांच्या शिष्टमंडळासह भेटून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निळ्या पुर रेषेमध्ये बांधकामावर लादलेली बंदी मागे घेणेबाबत निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व शहर जिल्हाप्रमुख अध्यक्ष राजीव कक्कड उपस्थित होते.निळ्या पुर रेषेमध्ये लादलेल्या बंदी हटविण्या बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदा मंत्री पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment